महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावात कोरोना रुग्णांना पीपीई किटविना भेटण्यास बंदी, नातेवाईकांचा गोंधळ

रुग्णालयाने पीपीई किट शिवाय प्रवेशाला बंदी घातल्याने काही रुग्णांच्या नातेवाईकांनी लगेच रुग्णालय परिसरातील मेडिकलवरून पीपीई किट खरेदी सुरू केली. अर्ध्या तासानंतर पीपीई किटची मागणी वाढताच मेडिकल चालक अडीचशे रुपयांचे पीपीई किट दुप्पट किमतीत विक्री करत होते. त्यामुळे नातेवाईकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. अनेक नातेवाईकांकडे पीपीई किटसाठी पैसे नसल्याने त्यांनी प्रशासनाच्या या निर्णयाविरुद्ध प्रचंड रोष व्यक्त केला.

रुग्णालयासमोर आंदोलन
रुग्णालयासमोर आंदोलन

By

Published : May 16, 2021, 8:04 PM IST

जळगाव- येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नातेवाईकांचा वावर वाढल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. ही बाब लक्षात आल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना पीपीई किट शिवाय रुग्णालयाच्या आत सोडू नये, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. या आदेशाची अंमलबजावणी रविवारी सकाळपासून सुरू झाली. त्यामुळे संतप्त झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी एकच गोंधळ घातला होता. या निर्णयामुळे आर्थिक भुर्दंड बसणार असून तो तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी करत नातेवाईकांनी रुग्णालयासमोर रस्त्यावर आंदोलन केले.

कोरोना रुग्णांना पीपीई किटविना भेटण्यास बंदी, नातेवाईकांचा गोंधळ

रुग्णांना पीपीई किटविना भेटण्यास बंदी

जिल्ह्यातील विविध कोविड रुग्णालयांमध्ये रुग्णांचे नातेवाईक वारंवार रुग्णाला भेटण्यासाठी जात आहेत. यामुळे कोरोनाचा प्रसार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकाला वॉर्डात प्रवेशाला मनाई करण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक बाब असल्यास नातेवाईकांना पीपीई किट घालूनच आत सोडण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी शनिवारी काढले होते. आज सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यायाकडून या आदेशाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात करण्यात आली. सकाळच्या सुमारास रुग्णाचे नातेवाईक रुग्णाला नाश्ता व जेवणाचा डबा देण्यासाठी आले असता, त्यांना सुरक्षारक्षकांनी अडवत तुम्हाला पीपीई किटशिवाय आत जाता येणार नसल्याचे सांगत त्यांना प्रवेशद्वारावरच रोखण्यात आले.

मागणी वाढताच पीपीई किटच्या किमती वाढल्या
रुग्णालयाने पीपीई किट शिवाय प्रवेशाला बंदी घातल्याने काही रुग्णांच्या नातेवाईकांनी लगेच रुग्णालय परिसरातील मेडिकलवरून पीपीई किट खरेदी सुरू केली. अर्ध्या तासानंतर पीपीई किटची मागणी वाढताच मेडिकल चालक अडीचशे रुपयांचे पीपीई किट दुप्पट किमतीत विक्री करत होते. त्यामुळे नातेवाईकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. अनेक नातेवाईकांकडे पीपीई किटसाठी पैसे नसल्याने त्यांनी प्रशासनाच्या या निर्णयाविरुद्ध प्रचंड रोष व्यक्त केला.

तणाव वाढल्यामुळे पोलिसांना केले पाचारण
नातेवाईकांनी गोंधळ घातल्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकडून पोलिसांचा बंदोबस्त मागविण्यात आला. यावेळी जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांच्यासह कर्मचारी दाखल झाले. तणावाचे वातावरण असल्याने क्युआरटी पथकाला देखील पाचारण करण्यात आले. पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढल्यानंतर नातेवाईकांनी रास्तारोको आंदोलन मागे घेतले.

नातेवाईकांसाठी उपलब्ध करुन दिले ५० किट
अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी याबाबतची माहिती जिल्हाधिकार्‍यांना दिली. दरम्यान, जिल्हाधिकार्‍यांनी रुग्णालयाकडून नातेवाईकांना ५० पीपीई किट देण्याच्या सूचना अधिष्ठातांना केल्या. त्यानंतर पाच-पाच जणांना पीपीई किट घालून आत जेवणाचा डबा व पाणी देण्यासाठी आता सोडण्यात आले.

हेही वाचा -वादळाचा तडाखा! जळगावात झोपडीवर झाड कोसळून 2 बहिणींचा मृत्यू

हेही वाचा -Cyclone Tauktae : सिंधुदुर्गात तौत्के चक्रीवादळाचे थैमान, महामार्गावरील अपघातात एकाच मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details