महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यात पोलिओ लसीकरणाला सुरुवात; पालकमंत्र्यांच्या हस्ते मोहिमेचे उदघाटन - जळगाव पोलिओ लसीकरण

जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात पावणे चार लाख बालकांना पोलिओचे लसीकरण होणार आहे. जळगाव जिल्हा शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात सकाळी साडेनऊ वाजता जिल्हास्तरीय लसीकरण मोहिमेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

Polio
गुलाबराव पाटील लसीकरण करताना

By

Published : Jan 31, 2021, 11:26 AM IST

जळगाव - कोरोनाच्या संसर्गामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या पल्स पोलिओच्या लसीकरण मोहिमेला आजपासून (31 जानेवारी) सर्वत्र सुरुवात झाली. जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात पावणे चार लाख बालकांना पोलिओचे लसीकरण होणार आहे. जळगाव जिल्हा शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात सकाळी साडेनऊ वाजता जिल्हास्तरीय लसीकरण मोहिमेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

जळगाव जिल्ह्यात पोलिओ लसीकरणाला सुरुवात
कोरोनाचा संसर्ग लक्षात घेऊन फिजिकल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. एन. चव्हाण, अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार आदींची उपस्थिती होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिओच्या लसीकरणासाठी खबरदारी म्हणून आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. या मोहिमेत जी बालके लसीकरणापासून वंचित राहतील; त्यांना घरी जाऊन लसीकरण होणार आहे.
जळगाव जिल्ह्यात पोलिओ लसीकरणाला सुरुवात
जिल्ह्यात 2654 बुथवर लसीकरण-पोलिओ लसीकरणासाठी जिल्हाभरात 2654 बूथ उभारण्यात आले आहेत. प्रत्येक बुथवर शून्य ते पाच वर्षे वयोगटातील चिमुकल्यांना लसीकरण होणार आहे. 3 लाख 72 हजार 164 बालकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी जिल्ह्यात 7269 कर्मचारी तर 558 पर्यवेक्षक फिल्डवर आहेत. पालकांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आवाहन-पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन केल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पालकांना आपल्या बालकांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले. शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना जवळच्या बूथवर नेत लसीकरण करून घ्यावे. कोरोनामुळे ही लसीकरण मोहीम पुढे ढकलण्यात आली होती, परंतु संसर्ग आटोक्यात आल्यानंतर आता मोहीम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
जळगाव जिल्ह्यात पोलिओ लसीकरणाला सुरुवात

ABOUT THE AUTHOR

...view details