महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावात भरधाव टँकरची दुचाकीला धडक; पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू - जळगाव

पोलीस कर्मचारी पाटील हे जळगाव पोलीस मुख्यालयात पोलीस वाहनावर चालक म्हणून कार्यरत होते. ते रविवारी दुपारी काम आटोपल्यानंतर जळगावहून घरी एरंडोलला परतत होते. त्यावेळी त्यांची दुचाकी एरंडोलजवळ आली असता गॅसची वाहतूक करणाऱ्या टँकरने त्यांना धडक दिली.

मृत पोलीस कर्मचारी

By

Published : Jun 3, 2019, 8:05 AM IST

Updated : Jun 3, 2019, 11:44 AM IST

जळगाव- जिल्ह्यातील एरंडोल शहराजवळ भरधाव टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. प्रकाश तुकाराम पाटील (वय ४५) असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

पाटील हे जळगाव पोलीस मुख्यालयात पोलीस वाहनावर चालक म्हणून कार्यरत होते. ते रविवारी दुपारी काम आटोपल्यानंतर जळगावहून घरी एरंडोलला परतत होते. त्यावेळी त्यांची दुचाकी एरंडोलजवळ आली असता गॅसची वाहतूक करणाऱ्या टँकरने त्यांना धडक दिली. त्यामध्ये पाटील यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

मृत प्रकाश पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. याबाबत मधुकर राजाराम पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून टँकर चालक शादाब मोईनोद्दीन याला अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याविरुद्ध एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Last Updated : Jun 3, 2019, 11:44 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details