महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक; फेसबुकवर झालेल्या मैत्रीतून तरुणीवर अत्याचार; जवानास पोलिसांनी ठोकल्या बेड्या - latest girl physical abused case

शहरातील एक तरूणी एका बँकेत सप्टेंबर २०१९ पासून नोकरीला लागली होती. फेसबुकद्वारे तिची सैन्य दलातील जवान अमितकुमार अशोककुमार भूमीहार याच्याशी ओळख झाली. त्यानंतर काही काळाने संशयित तरुणीच्या खोलीवर आला. लग्नाचे आमिष दाखवून बळजबरीने त्याने अत्याचार करून अश्लिल व्हिडिओ तयार केला.

army
भुसावळ पोलीस ठाणे

By

Published : Aug 29, 2020, 4:25 PM IST

जळगाव - सैन्यातील जवानाने लग्नाच्या आमिषाने शहरातील एका तरुणीवर अत्याचार केले. केलेल्या अत्याचाराचा अश्लील व्हिडिओ बनवून पीडित तरुणीला ब्लॅकमेल केल्याप्रकरणी जवानावर भुसावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमितकुमार अशोककुमार भूमीहार असे अटक करण्यात आलेल्या अत्याचारी जवानाचे नाव आहे. फेसबुकच्या माध्यमातून बँकेतील तरूणीशी झारखंड येथील या जवानाने मैत्री केली होती.

शहरातील एक तरूणी एका बँकेत सप्टेंबर २०१९ पासून नोकरीला लागली होती. फेसबुकद्वारे तिची सैन्य दलातील जम्मू काश्मीर येथे कर्तव्यावर असलेल्या जवान अमितकुमार अशोककुमार भूमीहार (वय ३५, रा.रांची, झारखंड) याच्याशी ओळख झाली. त्यानंतर काही काळाने संशयित तरुणीच्या खोलीवर आला. लग्नाचे आमिष दाखवून बळजबरीने त्याने अत्याचार करून अश्लिल व्हिडीओ तयार केला. त्या आधारे तो तरुणीला ब्लॅकमेल करू लागला.

याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्‍यात अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला. संबंधित जवान शहरात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी संशयिताला अटक केली. संशयिताला भुसावळ न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप भागवत करत आहेत. हे प्रकरण समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details