महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तरुणावर चाकू हल्ल्यानंतर झाडल्या गोळ्या, पोलिसांनी काही तासात आवळल्या मारेकऱ्यांच्या मुसक्या

मंगळवारी रात्री विलास त्याच्या घराजवळ एकटा बसलेला असताना तिघांनी त्याच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात गंभीर जखमी झाल्याने विलासने घराकडे पळ काढला होता. त्यानंतर तीनही संशयित आरोपींनी त्याचा पाठलाग करत घरात घुसून गावठी कट्ट्यातून त्याच्यावर गोळीबार केला.

crime news
पकडलेल्या मारेकऱ्यांसह पोलीस पथक

By

Published : Aug 26, 2020, 9:16 PM IST

जळगाव - भुसावळ शहरातील श्रीरामनगरात मंगळवारी घडलेल्या हत्याकांडाचा काही तासातच उलगडा करण्यात भुसावळ पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली आहे. दरम्यान, पूर्ववैमनस्यातून हे हत्याकांड झाल्याचे समोर आले आहे. अक्षय न्हावकर, अभिषेक शर्मा आणि आकाश पाटील अशी अटक केलेल्या तीनही संशयित आरोपींची नावे असून, तिघे भुसावळातील रहिवासी आहेत.

भुसावळ शहरातील श्रीरामनगरातील विलास दिनकर चौधरी या तरुणाची मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास पूर्ववैमनस्यातून निर्घृणपणे हत्या झाली होती. संशयित आरोपी असलेले अक्षय न्हावकर, अभिषेक शर्मा आणि आकाश पाटील यांच्याशी 20 ऑगस्ट रोजी विलासचा वाद झाला होता. या वादाचा राग संशयितांनी मनात ठेवला होता. मंगळवारी रात्री विलास त्याच्या घराजवळ एकटा बसलेला असताना तिघांनी त्याच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात गंभीर जखमी झाल्याने विलासने घराकडे पळ काढला होता. त्यानंतर तीनही संशयित आरोपींनी त्याचा पाठलाग करत घरात घुसून गावठी कट्ट्यातून त्याच्यावर गोळीबार केला. त्यात विलासचा मृत्यू झाला होता. या घटनेवेळी आरोपींशी झालेल्या झटापटीत विलासच्या आईला देखील दुखापत झाली होती.

या घटनेनंतर मृत विलासचे वडील दिनकर लक्ष्मण चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन बाजारपेठ पोलीस ठाण्यात तीनही संशयित आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांनी तपासचक्रे फिरवून काही तासातच फरार असलेले संशयित आरोपी अक्षय न्हावकर, अभिषेक शर्मा आणि आकाश पाटील यांच्या मुसक्या आवळल्या.

भुसावळ शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचा आलेख वाढला आहे. हाणामाऱ्या, चोरी, खून असे गंभीर गुन्हे सातत्याने घडत असून, पोलिसांचा वचक कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details