जळगाव - पोलिसांना बघताच गोळीबार करून पळ काढण्याच्या प्रयत्नात असणार्या पाच गुन्हेगारांना पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून अटक केली आहे. भुसावळ शहरातील लोणारी मंगल कार्यालयाच्या परिसरात ही घटना घडली आहे. राजू बारे, भूषण यशवंत मोरे, विल्सन अलेक्झांडर जोसेफ (२७), सागर आनंदा पारधे (३०), ऑस्टीन शरद रामटेके (२१ ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. हे सर्व जण हुडको कॉलनीतील रहिवासी आहेत.
गोळीबार करून काढला पळ-