महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खबरदारी कोरोनाची: पिलखोडवासीयांनी रिकामटेकड्यांचा 'असा' केला बंदोबस्त - ऑईल लावा मोहीम जळगाव

गावातील प्रत्येक चौकात असलेले बाक, उंबरठे, झाडांचे पार याठिकाणी ग्रामस्थांनी चक्क काळे ऑईल लावले आहे. यामुळे कोणालाही बसणे शक्य होणार नाही. तरुणांनी लढवलेली शक्कल सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे.

corona jalgaon
सार्वजनिक ठिकाणी बसण्याच्या जागेवर ऑईल लावताना ग्रामस्थ

By

Published : Mar 25, 2020, 1:05 PM IST

जळगाव- कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात असताना आता नागरिक देखील स्वयंप्रेरणेने पुढे येत असल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात असलेल्या पिलखोड गावात सार्वजनिक ठिकाणी कुणीही विनाकारण बसू नये, म्हणून बसण्याच्या जागांवर ग्रामस्थांनी चक्क काळे ऑईल टाकले आहे. कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी पिलखोडकरांनी रिकामटेकड्यांचा अनोख्या पद्धतीने केलेला बंदोबस्त चर्चेचा विषय ठरला आहे.

सार्वजनिक ठिकाणी बसण्याच्या जागेवर ऑईल लावताना ग्रामस्थ

कोरोना विषाणूचा संसर्ग अधिक फैलावू नये, यासाठी केंद्र सरकारने १४ एप्रिलपर्यंत संपूर्ण देशभरात 'लॉकडाऊन' जाहीर केला आहे. जोपर्यंत कोरोनाच्या प्रसाराची साखळी खंडित होत नाही, तोपर्यंत त्याचा अटकाव करणे शक्य होणार नाही. म्हणून आता अधिक कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहे. याच दृष्टीने पिलखोडवासीयांनी पावले टाकली आहेत. गावातील सार्वजनिक ठिकाणी सकाळी आणि सायंकाळी लोकांची गर्दी जमते. राज्य सरकारने आवाहन करूनही काहीएक फरक पडत नसल्याने गावातील काही तरुणांनी अभिनव शक्कल लढवली आहे.

गावातील प्रत्येक चौकात असलेले बाक, उंबरठे, झाडांचे पार याठिकाणी त्यांनी चक्क काळे ऑईल लावले आहे. यामुळे कोणालाही बसणे शक्य होणार नाही. तरुणांनी लढवलेली शक्कल सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. दरम्यान, पिलखोड गावातील तरुणांनी दाखवलेल्या समजूतदारपणाचे जिल्हा प्रशासनाकडून कौतुक केले जात आहे. जिल्ह्यातील इतर प्रत्येक गावातील ग्रामस्थांनी देखील अशाच प्रकारे सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा-जळगावात जमावबंदी आदेशाचे उल्लंघन; विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना पोलिसांकडून प्रसाद

ABOUT THE AUTHOR

...view details