महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लग्नाचे आमिष दाखवत विधवा महिलेवर चुलत दिराकडून अत्याचार - पाचोरा पोलीस स्टेशन

२४ वर्षीय विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून चुलत दिराने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शिवाय ७३ लाख ६४ हजार ५०१ रुपये आणि सोन्याचे दागिने घेवुन महिलेची फसवणूक केली आहे. याप्रकरणी मंगळवारी रात्री पाचोरा पोलीस ठाण्यात चुलत दीर व सासरे यांच्यासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

pachora police station
pachora police station

By

Published : Mar 3, 2022, 9:38 AM IST

जळगाव -पाचोरा तालुक्यातील एका गावात २४ वर्षीय विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून चुलत दिराने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शिवाय ७३ लाख ६४ हजार ५०१ रुपये आणि सोन्याचे दागिने घेवुन महिलेची फसवणूक केली आहे. याप्रकरणी मंगळवारी रात्री पाचोरा पोलीस ठाण्यात चुलत दीर व सासरे यांच्यासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

२४ वर्षीय महिलेच्या पतीचा 2020 मध्ये करोनाने मृत्यू झाला होता. पीडित महिलेचा पती आयटी इंजिनिअर होता. दरम्यान, पतीच्या मुत्युनंतर चुलत दीर आणि सासू, सासऱ्याने फसवणुक करण्याचा कट रचुन संगनमताने महिलेच्या आई वडिलांकडे माहेरी जावु दिले नाही. तसेच महिलेला तिच्या चुलत दीरासोबत लग्नाचे आमीष दाखविले. पीडिता लग्नानंतर शारिरीक संबंध ठेवु असे सांगत असताना देखील वेळोवेळी शारिरीक संबंध ठेवुन चुलत दिराने महिलेवर बलात्कार केला. तसेच अद्यापपर्यत लग्न केले नाही व लग्नासही नकार दिला. तसेच चुलत सासरे व दिर अशा तिघांनी मिळून महिलेचा विश्वास संपादन करुन वेगवेगळ्या कारणाने महिलेच्या पतीच्या खात्यातील ७३ लाख ६४ हजार ५०१ रुपये वळते करुन घेतले. एवढेच नाहीतर महिलेच्या मुलीचे ११२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने सुद्धा ठेवून घेतले. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवारी पाचोरा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किसन सज्जनराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details