जळगाव -पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. जळगावात शनिवारी पेट्रोलचे दर 38 तर डिझेलचे दर 39 पैशांनी वाढले. त्यामुळे शनिवारी जळगावात पेट्रोल 98.05 रुपये प्रतिलीटर तर डिझेल 87.74 रुपये प्रतिलीटर झाले आहे. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे आर्थिक बजेट बिघडले आहे.
आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर 2 रुपयांनी वाढले
गेल्या आठवडाभराचा विचार केला तर जळगावात पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रत्येकी दोन रुपयांपेक्षा अधिक वाढले आहेत. आठवडाभरापूर्वी म्हणजेच, रविवारी जळगावात पेट्रोलचे दर 96.27 तर डिझेलचे दर 85.76 रुपये प्रतिलीटर होते. 6 दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर पेट्रोल आणि डिझेल 2 रुपयांनी वाढले आहे. इंधन दरवाढ आता सर्वसामान्यांच्या मुळावर उठली आहे. त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
पेट्रोल डिझेलचे दर शंभरीकडे
पेट्रोल आणि डिझेलचे दर अशाच प्रकारे वाढत राहिले तर ते लवकरच शंभरीचा टप्पा पार करतील. पेट्रोलचे दर तर शंभरीच्या टप्प्यात आले आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर याच आठवड्यात पेट्रोल शंभर रुपये प्रतिलीटर होईल. पेट्रोल पाठोपाठ डिझेलचे दरही शंभरीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. इंधनाचे दर वाढले की महागाई आपोआप भडकते, त्यामुळे सरकारने इंधनाचे दर कमी करावेत, अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून केली जात आहे.
जळगावात पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा भडकले; पेट्रोल 38 तर डिझेल 39 पैशांनी महागले!
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. जळगावात शनिवारी पेट्रोलचे दर 38 तर डिझेलचे दर 39 पैशांनी वाढले. त्यामुळे शनिवारी जळगावात पेट्रोल 98.05 रुपये प्रतिलीटर तर डिझेल 87.74 रुपये प्रतिलीटर झाले आहे.
जळगावात पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा भडकले