महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावात धावत्या रेल्वेखाली तरुणाची आत्महत्या

सुमितचे वडील हे हात मजुरी करतात. एकुलता-एक मुलगा असल्यामुळे मुलाचा मृतदेह पाहून वडिलांनी जिल्हा रुग्णालयात एकच आक्रोश केला होता.

Suicide
अ‍ात्महत्या

By

Published : Oct 30, 2020, 3:06 PM IST

जळगाव - शहरातील पिंप्राळा परिसरातील 25 वर्षीय तरुणाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी रात्री घडली. याप्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सुमित कैलास खेडकर (वय 25, रा. पिंप्राळा हुडको, नवीन दुध फेडरेशन जवळ) असे तरुणाचे नाव आहे.


अधिक माहिती अशी, की सुमित हा बी. कॉम.च्या दुसऱ्या वर्षाला शिक्षण घेत आहे. सोबत बॉम्बे सायकल मार्टवर गेल्या दोन महिन्यांपासून कामाला होता. त्यामुळे कुटुंबीयांना हातभार लागत होता. दरम्यान काल रात्री 11च्या सुमारास जळगाव शहरातील रेल्वे थांबा क्रमांक 418/ 15-17 डाऊनवर धावत्यारेल्वेखाली आत्महत्या केल्याचे समोर आले. सुरुवातीला अनोळखी म्हणून लोहमार्ग पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. म्रूत तरूणाच्या खिशात आधारकार्ड पॅनकार्ड यांच्या आधारावरून ओळख पटली.

सुमितचे वडील हे हात मजुरी करतात. एकुलता-एक मुलगा असल्यामुळे मुलाचा मृतदेह पाहून वडिलांनी जिल्हा रुग्णालयात एकच आक्रोश केला होता. लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details