महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावात थंडीचा कडाका वाढला; नागरिकांची स्वेटर, जॅकेट खरेदीसाठी मार्केटमध्ये गर्दी

जळगाव जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे उबदार कपडे खरेदी करण्यासाठी नागरिकांची वूलन मार्केटमध्ये गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. स्थानिक लोकांनीच स्वेटर विक्रीची दुकाने थाटली आहेत.

Jalgaon_sweater market news
जळगाव जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला

By

Published : Dec 22, 2020, 4:22 PM IST

जळगाव - गेल्या आठवडाभरापासून जळगाव जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे उबदार कपडे खरेदी करण्यासाठी नागरिकांची वूलन मार्केटमध्ये गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने जळगाव शहरात तिबेटी स्वेटर विक्रेते दाखल झाले नाहीत. स्थानिक लोकांनीच स्वेटर विक्रीची दुकाने थाटली आहेत. याठिकाणी नागरिक स्वेटर, जॅकेट, कानटोपी, मफलर असे उबदार कपडे खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत.

जळगाव जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला

थंडी वाढताच ग्राहकांची वर्दळ

जळगाव शहरात शिवतीर्थ मैदानावर स्वेटर जॅकेट विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. याठिकाणी नागरिक उबदार कपडे खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत. यावर्षी बाजारात निरनिराळ्या रंगसंगतीचे व प्रकाराचे आकर्षक असे जॅकेट व स्वेटर विक्रीसाठी दाखल झाले आहेत. लेदरऐवजी लोकरच्या स्वेटरला सर्वाधिक पसंती लाभत आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अशा सर्वांसाठी आकर्षक असे स्वेटर, जॅकेट उपलब्ध आहेत.


कोरोनाचा फटका
शिवतीर्थ मैदानावर गेल्या महिनाभरापासून स्वेटर विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. परंतु, सुरुवातीच्या काळात थंडी कमी प्रमाणात होती. आता आठवडाभरापासून थंडीचा कडाका वाढल्याने ग्राहकांची स्वेटर खरेदीसाठी या ठिकाणी गर्दी होत आहे. वूलन बाजारातील आर्थिक उलाढाली विषयी बोलताना विक्रेते रमेश थोरात म्हणाले की, या वर्षी कोरोनामुळे जळगावात तिबेटी स्वेटर विक्रेते दाखल झालेले नाही. त्यामुळे स्थानिक विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणावर दुकाने लावलेली आहेत. आठवडाभरापासून थंडीचा कडाका वाढल्याने नागरिक स्वेटर खरेदीसाठी येत आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात व्यवसायात 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आमच्याकडे 400 रुपयांपासून दोन ते अडीच हजार रुपयांपर्यंत चांगल्या दर्जाचे स्वेटर तसेच जॅकेट उपलब्ध आहे. यावर्षी लोकरच्या कपड्यांना चांगली मागणी असल्याचे थोरात यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. कैलास राजपूत म्हणाले की यावर्षी कोरोनामुळे व्यवसायावर काही अंशी परिणाम झालेला आहे. आम्ही पंजाब राज्यातील लुधियाना येथून माल मागवला आहे. कोरोनामुळे नवीन माल मिळू शकला नाही. मालाचा शॉर्टटेज आहे. आता काही प्रमाणात बाजारपेठ सुरळीत होत असल्याने पुढील महिन्यात पुरेसा माल उपलब्ध होण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा -सरकार शेतकऱ्यांना दिलेली आश्वासन पाळणार नसेल तर जगण्याची इच्छा नाही - अण्णा हजारे

हेही वाचा -महाबळेश्वरमध्ये पारा घसरला, थंडीमुळे दवबिंदूही गोठले

ABOUT THE AUTHOR

...view details