जळगाव -जनता एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाची बॅग चोरट्यांनी लांबवल्याची घटना घडली आहे. या बॅगेत तीन मोबाईल, लॅपटॉप आणि रोकड असा एकूण 42 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल होता. याप्रकरणी अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव: रेल्वेतून प्रवाशाची ४२ हजारांचा ऐवज असलेली बॅग लंपास, गुन्हा दाखल - Jalgaon District Crime News
जनता एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाची बॅग चोरट्यांनी लांबवल्याची घटना घडली आहे. या बॅगेत तीन मोबाईल, लॅपटॉप आणि रोकड असा एकूण 42 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल होता. याप्रकरणी अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहन तडवी (वय ३०, रा. प्रेमनगर) हे गेल्या दोन वर्षांपासून मुंबईत वास्तव्यास आहे. ते जळगावहून कुर्ल्याला जाण्यासाठी जनता एक्सप्रेसमध्ये बसले होते, त्यांनी आपली बॅग सीट खाली ठेवली होती. त्यांना झोप लागली असता, संधी साधून चोरट्यांनी ही बॅग लांबवली. सकाळी उठल्यानंतर त्यांना आपली बॅग चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी याप्रकणी कुर्ला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान चोराचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.