जळगाव - आतापर्यंत प्रशासकीय अधिकारी, अर्थतज्ज्ञ, संशोधक, डॉक्टरेट असलेली व्यक्ती राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष झालेत. मात्र, पहिल्यांदाच घटनेचे पान फाडून तिथे दहावी शिकलेला व्यक्ती म्हणून आपण कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष झालो. हा मोठा चमत्कार असल्याचे वक्तव्य राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले. रावेर येथे एका साप्ताहिकाच्या वतीने आयोजित शेतकरी सन्मान सोहळ्यात ते बोलत होते.
दहावी शिकलेला व्यक्ती कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष हा मोठा चमत्कार - पाशा पटेल - jalgoan
आतापर्यंत प्रशासकीय अधिकारी, अर्थतज्ज्ञ, संशोधक, डॉक्टरेट असलेली व्यक्ती राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष झालेत. मात्र, पहिल्यांदाच घटनेचे पान फाडून तिथे दहावी शिकलेला व्यक्ती म्हणून आपण कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष झालो.
कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष होणे ही बाब माझ्यासाठी चमत्कार आहे. कृषी मूल्य आयोगाची स्थापना करणारे कर्नाटक हे देशातील पहिले राज्य आहे. कर्नाटकनेही आपल्या कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष बंगळुरू कृषी विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाच्या प्रमुखांना केले होते. मी तर दहावी शिकलेला व्यक्ती होतो. त्यामुळे अध्यक्षाचे पान मी फाडले आणि तिथे दुसरे पान लावले, असेही पटेल यावेळी म्हणाले. या सोहळ्याला माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, माजी आमदार शिरीष चौधरी उपस्थित होते.