जळगाव -कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा परिषदेतही 3 ते 7 ऑगस्ट या कालावधीत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयात न येता 'वर्क फ्रॉम होम' या संकल्पनेतून घरुनच कामकाज करण्याचे आदेश कोरोनाचे इन्सीडेंट कमांडर तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन.पाटील यांनी काढले आहेत.
जळगाव जिल्हा परिषदेत आता 'वर्क फ्रॉम होम' चे आदेश
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा परिषदेतही 3 ते 7 ऑगस्ट या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना घरुनच काम करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पाटील यांनी दिले आहेत.
दरम्यान, घरुन काम करताना अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले असून विभाग प्रमुखांनी अत्यावश्यक कामासाठी कार्यालयात बोलावल्यास कर्मचाऱ्यांनी यावे, असेही आदेशात म्हटले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा 13 मार्चपासून लागू करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेत अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत आहे. यावर संपर्क साखळी तोडण्यासाठी 3 ते 7 ऑगस्ट या कालावधीत आठवडाभर घरुनच कामकाज करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.
काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेत 5-7 जणांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यावेळी वर्क फ्रॉम होमच्या कुठल्याही सूचना नव्हत्या. आता बदल्यांच्यावेळी वेळी एवढी गर्दी झाली ही कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमच्या सूचना देण्यात आल्या. याबद्दल अश्चर्य व्यक्त केले जात आहे.