जळगाव -पणन महासंघातर्फे करण्यात येणाऱ्या कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी जिल्हा सूचना व विज्ञान कार्यालयातर्फे सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. त्याची अंमलबजावणी करण्याच्या परवानगीसाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत हे पणन महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे.
जळगावात कापूस खरेदीसाठी नोंदणीचे ऑनलाईन सॉफ्टवेअर तयार
बाजार समितीमध्ये नोंदणी करुन टोकन देण्यासाठी शेतकऱ्यांची ५ हजार रुपये घेऊन आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचे प्रकार समोर आले. त्यामुळे यंदा ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी जिल्हाधिकारी राऊत हे आग्रही आहेत. त्यानुसार जिल्हा सूचना व विज्ञान केंद्राने सॉफ्टवेअरही तयार केले आहे. पणन महासंघाकडून ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला परवानगी घेण्यासाठी जिल्हाधिकारी पणन महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.
कापूस खरेदीबाबत अद्यापही प्रशासनाला पणन महासंघाकडून कळवण्यात आलेले नाही. खरेदी केंद्रांवर कापूस विक्रीसाठी पूर्वी बाजार समितीकडून शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येत होती. नाेंदणी झाल्यानंतर शेतकऱ्यांना टोकन देण्यात येत होते; परंतु बाजार समितीमध्ये नोंदणी करुन टोकन देण्यासाठी शेतकऱ्यांची ५ हजार रुपये घेऊन आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचे प्रकार समोर आले. त्यामुळे यंदा ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी जिल्हाधिकारी राऊत हे आग्रही आहेत. त्यानुसार जिल्हा सूचना व विज्ञान केंद्राने सॉफ्टवेअरही तयार केले आहे. पणन महासंघाकडून ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला परवानगी घेण्यासाठी जिल्हाधिकारी पणन महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.
राज्यभरात कापूस खरेदीसाठी ऑफलाईन नोंदणी करण्याची पध्दत आहे. सॉफ्टवेअरद्वारे ऑनलाईन नोंदणीसाठी परवानगी मिळाल्यास कापूस खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीचा जळगाव पॅटर्न राज्यभरात लागू होण्याची शक्यता आहे.