चाळीसगाव (जळगाव) - येथील बाजार समितीत मंगळवारी मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक वाढली आहे. त्यामुळे कांद्याच्या भावात क्विंटलमागे एक हजार रुपयाची घसरण झाली. यामुळे तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी चांगलाच हवालदिल झाला आहे. दरम्यान, केंद्र सरकारने कांदा साठवणुकीवर मर्यादा लादल्याने सहा दिवस कांदा लिलाव बंद होते. सोमवारी हे लिलाव सुरळीत झाले. मात्र, गेल्या आठवड्याच्या तुलनेत भावात सरासरी एक हजाराची घसरण झाल्याने कांद्याला ५४०० रुपये एवढाच भाव मिळाला.
चाळीसगाव बाजार समितीत आवक वाढल्याने कांद्याच्या भावात घसरण, कांदा उत्पादक हवालदिल - Onion export ban
शुक्रवारी ईदची सुट्टी तर शनिवार व रविवारचे बंद असलेले लिलाव २ नोव्हेंबरला सुरू झाले. तर २६ ऑक्टोंबरला लिलाव बंद झाले तेव्हा कांद्याचे दर कोसळून ५४५० रुपये भाव मिळाला होता. लिलाव प्रक्रियेत उन्हाळी कांद्याला २ हजार ते ५३७६, नवीन कांद्याला ३२०१ रुपये भाव मिळाला. गेल्या आठवड्यात उन्हाळी कांद्याला ६६०० चा भाव होता. मंगळवारी त्यात घसरण झाली.

केंद्र सरकारने व्यापाऱ्यांच्या साठेबाजीवर मर्यादा आणली. यानंतर चाळीसगाव येथील व्यापाऱ्यांनी २७ ऑक्टोंबरपासून कांदा लिलाव बंद ठेवले होते. यामुळे कांदा लिलावातून बाजार समितीत दररोज होणारी सुमारे ४० लाखांची उलाढाल ठप्प झाली. 30 ऑक्टोंबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी केल्यानंतर हा तिढा सुटला. पण शुक्रवारी ईद शनिवार व रविवारचे बंद असलेले लिलाव २ नोव्हेंबरला सुरू झाले. दरम्यान, २६ ऑक्टोबरला लिलाव बंद झाले तेव्हा कांद्याचे दर कोसळून ५४५० रुपये भाव मिळाला होता. मंगळवारी बाजार समितीच्या नागद रोडवरील उपआवारात लिलाव झाले. ६८ वाहनांमधून ८०० क्विंटल आवक झाली. लिलाव प्रक्रियेत उन्हाळी कांद्याला २ हजार ते ५३७६, नवीन कांद्याला ३२०१ रुपये भाव मिळाला. गेल्या आठवड्यात उन्हाळी कांद्याला ६६०० चा भाव होता. मंगळवारी त्यात घसरण झाली.
शेतकऱ्यांची पिळवणूक
६०० रुपये क्विंटलने कांदा विक्री सुरू होती, तेव्हा सरकारने आमच्याकडे दुर्लक्ष केले, होणारा खर्च लक्षात घेऊन हमीभावाची गरज आहे. कांद्याला चांगले भाव मिळत असताना निर्बंध लादून शेतकऱ्यांची पिळवणूक केली. चाळीसगाव येथील शेतकरी गोरख पाटील यांनी ही व्यथा मांडली.
उन्हाळी कांद्याचे प्रमाण सर्वाधिक
मंगळवारी मार्केटला आवक झालेल्या मालात उन्हाळी कांद्याचे प्रमाण सर्वाधिक होते. नवीन कांदा फारसा आला नाही. उन्हाळी कांद्याला २ हजार ते ५३७६ प्रतिक्विंटल असा सर्वाधिक भाव मिळाला, तर नवीन लाल कांद्याचा दर ३२०० रुपये प्रतिक्विंटल पुकारला गेला.