जळगाव- जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मंगळवारी जळगावात तब्बल 116 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आता जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 1 हजार 281 वर पोहोचला आहे. जिल्ह्यात प्रथमच शतकापेक्षा अधिक रुग्ण एकाच दिवसात आढळून आले आहेत.
जिल्हा प्रशासनाला मंगळवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये तब्बल 116 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील 24, भुसावळ 5, अमळनेर 3, चोपडा 21, भडगाव 1, पाचोरा 1, धरणगाव 8, यावल 7, एरंडोल 10 तसेच जामनेर 9, जळगाव ग्रामीण 3, रावेर 1, पारोळा 14, मुक्ताईनगर 3 आणि बोदवड येथील 6 रुग्णांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.
जळगावात आतापर्यंत 129 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यात 122 जणांचे मृत्यू हे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाले आहेत. आतापर्यंत 567 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सद्यस्थितीत 585 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यातील एकूण रुग्ण -
जळगाव शहर- 262
भुसावळ- 259
अमळनेर- 172
चोपडा- 84
पाचोरा- 36
भडगाव- 85
धरणगाव- 45