जळगाव - जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोरोना कक्षात उपचार घेत असलेल्या एका 72 वर्षीय कोरोना संशयित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या रुग्णाचे वैद्यकीय नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. मात्र, अद्याप त्याचा अहवाल प्राप्त झाला नसल्याने रुग्णाचा मृत्यू नेमका कशाने झाला? हे स्पष्ट झालेले नाही.
Coronavirus : जळगावात कोरोना संशयित रुग्णाचा मृत्यू - जळगाव शासकीय रुग्णालय
जळगावच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोरोना कक्षात उपचार घेत असलेल्या एका 72 वर्षीय कोरोना संशयित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृत रुग्ण हा जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील असून त्यांना सोमवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णाचे वैद्यकीय नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
मृत रुग्ण हा जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील असून त्यांना सोमवारी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना उच्च रक्तदाब आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने खबरदारी म्हणून कोरोना कक्षात ठेवण्यात आले होते. मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यात न्यूमोनियाची देखील लक्षणे दिसून आली होती. त्यामुळेही त्यांचा मृत्यू झाला असू शकतो.
दरम्यान, या घटनेसंदर्भात शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाकडून अद्यापही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. वैद्यकीय तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतरच रुग्णाच्या मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे. त्यानंतर प्रशासनाकडून माहिती दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र, कोरोना संशयित रुग्णाच्या मृत्यूच्या बातमीला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.