जळगाव - जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग थांबत नसल्याचे चित्र आहे. गुरुवारी एकाच दिवसात तब्बल 15 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हा रुग्णालय प्रशासनाला रात्री प्राप्त झालेल्या तपासणी अहवालात 10 रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या 10 जणांमध्ये 7 रुग्ण हे हॉट स्पॉट असलेल्या अमळनेर शहरातील आहेत तर उर्वरित 3 रुग्ण हे पाचोरा शहरातील आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी 100 वर पोहचली असून जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणेच्या अडचणी वाढल्या आहेत.
जळगावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येने गाठली शंभरी; अमळनेरात पुन्हा 7 रुग्णांची भर - जळगाव कोरोना
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 100 इतकी झाली असून, त्यापैकी 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 3 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील अमळनेर व पाचोरा येथे स्वॅब घेतलेल्या 78 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल गुरुवारी रात्री प्राप्त झाले आहे. यापैकी 68 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून 10 व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये पाचोरा येथील आंबेडकर नगरातील 21 वर्षीय तरूण, गिरडरोड येथील 49 वर्षीय पुरूष, आंतुर्ली येथील 50 वर्षीय पुरूष अशा 3 तर अमळनेर येथील अमलेश्वर नगरातील 6 व माळीवाडा येथील 1 अशा 7 व्यक्तींचा समावेश आहे. निगेटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये पाचोरा येथील 16, भडगाव येथील एक व अमळनेर येथील 51 व्यक्तींचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 100 इतकी झाली असून, त्यापैकी 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 3 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.