महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धनंजय मुंडेंचा राजीनामा मागण्याचा कुणालाही अधिकार नाही - गुलाबराव पाटील - गुलाबराव पाटील याच्या बद्दल बातमी

धनंजय मुंडेंचा राजीनामा मागण्याचा कुणआलाही अधिकार नाही, अशा शब्दात गुलाबराव पाटलांनी विरोधकांना खडे बोल सुनावले. जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात शनिवारी सकाळी कोरोना लसीकरणाला गुलाबराव पाटील उपस्थितीत प्रारंभ झाला.

gulabrao
धनंजय मुंडेंचा राजीनामा मागण्याचा कुणालाही अधिकार नाही - गुलाबराव पाटील

By

Published : Jan 16, 2021, 3:18 PM IST

Updated : Jan 16, 2021, 4:06 PM IST

जळगाव - कथित महिला अत्याचाराच्या प्रकरणात अडचणीत सापडलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ शिवसेना नेते गुलाबराव पाटील हे पुढे सरसावले आहेत. 'धनंजय मुंडेंनी स्वतः जाहीरपणे आपल्या दुसऱ्या कुटुंबाची कबुली दिली आहे. मात्र, तरीही विरोधकांकडून या प्रकरणी राजकारण केले जात आहे. मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागण्याचा कुणालाही अधिकार नाही', अशा शब्दांत गुलाबराव पाटलांनी विरोधकांना खडे बोल सुनावत मुंडेंची पाठराखण केली आहे.

धनंजय मुंडेंचा राजीनामा मागण्याचा कुणालाही अधिकार नाही - गुलाबराव पाटील

जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आज (शनिवारी) सकाळी कोरोना लसीकरणाला गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ झाला. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. गुलाबराव पाटील यांनी यावेळी मुंडेंच्या प्रकरणाबाबत आपले मत मांडताना विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.

विरोधक राजकारण करताहेत -

धनंजय मुंडे यांनी या प्रकरणाबाबत स्वतः कबुली दिली आहे. त्यांची कायदेशीर लढाई सुरू आहे. मात्र, विरोधकांकडून याप्रश्नी नाहक राजकारण केले जात आहे. त्यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार कोणालाही नाही. धनंजय मुंडे हे निर्दोष आहेत, असे मला वाटते. ते आपले निर्दोषत्व लवकरच सिद्ध करतील, असा विश्वास देखील गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.

एखाद्याची 30 वर्षांची तपश्चर्या उद्ध्वस्त करणे चुकीचे -

धनंजय मुंडे यांनी जनतेसमोर स्वतः कबुली दिली आहे. एखादा माणूस अशी कबुली देत असेल तरीही तुम्ही त्याला चोर ठरवणार काय? त्यांना काही लपवायचे असते तर त्यांनी जाहीरपणे कबुली दिलीच नसती. अशा पद्धतीने राजकारण करून एखाद्याची 30 वर्षांची तपश्चर्या उद्ध्वस्त करू, असे जर कुणाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

Last Updated : Jan 16, 2021, 4:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details