महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 7, 2021, 1:00 PM IST

ETV Bharat / state

गुलाबराव पाटलांवर निलेश राणेंची शिवराळ भाषेतून टीका

भाजप नेते निलेश राणे यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर शिवराळ भाषेतून टीका केली आहे. निलेश राणेंनी आपल्या ट्विटर हँडलवरून शिवराळ भाषेतून मंत्री गुलाबराव पाटील यांना उद्देशून ट्विट केले आहे. दरम्यान, त्यांच्या या ट्विटमुळे जळगाव जिल्ह्यातील शिवसैनिक राणेंविरोधात आक्रमक झाले आहेत.

गुलाबराव पाटलांवर निलेश राणेंची शिवराळ भाषेतून टीका
गुलाबराव पाटलांवर निलेश राणेंची शिवराळ भाषेतून टीका

जळगाव : भाजप नेते निलेश राणे यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर शिवराळ भाषेतून टीका केली आहे. निलेश राणेंनी आपल्या ट्विटर हँडलवरून शिवराळ भाषेतून मंत्री गुलाबराव पाटील यांना उद्देशून ट्विट केले आहे. दरम्यान, त्यांच्या या ट्विटमुळे जळगाव जिल्ह्यातील शिवसैनिक राणेंविरोधात आक्रमक झाले आहेत.

गुलाबराव पाटलांवर निलेश राणेंची शिवराळ भाषेतून टीका

काय आहे निलेश राणेंचे ट्विट?
निलेश राणेंनी आपल्या ट्विटमध्ये गुलाबराव पाटील यांच्यावर कव्वाली गायनावरून शिवराळ भाषेत टीकास्त्र डागले आहे. त्यांनी शिवसेनेवरही जोरदार टीका केली आहे, 'असं बघून स्वर्गीय बाळासाहेबांची जास्त आठवण येते, आता शिवसेनेची वाटचाल काँग्रेस आणि एमआयएम पक्षाच्या दिशेने जोरदार सुरू आहे', अशा शब्दांत त्यांनी पाटील यांच्यावर टीका केली आहे.

कव्वाली गायनावरून टीका

शिवसेना नेते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे झालेल्या एका कार्यक्रमात कव्वाली गायन केले होते. कव्वाली गायन केल्याच्या याच मुद्द्यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना लक्ष्य केले आहे. निलेश राणेंनी आपल्या ट्विटर हँडलवर शिवराळ भाषेत मंत्री गुलाबराव पाटील यांना उद्देशून ट्विट केले आहे. दरम्यान, राणेंनी गुलाबराव पाटील यांच्यावर हल्लाबोल करताना शिवसेनेवरही जोरदार टीकास्त्र डागले आहे.

राणेंच्या ट्विटमुळे शिवसैनिक आक्रमक-
निलेश राणेंनी केलेल्या ट्विटमुळे जळगाव जिल्ह्यातील शिवसैनिक राणेंच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. आज जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पोलीस ठाण्यात निलेश राणेंविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश जळगावचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी दिले आहेत. त्यानुसार निलेश राणेंच्या विरोधात आज जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने होण्याची शक्यता आहे.

पुन्हा एकदा राणे विरुद्ध शिवसेना सामना रंगणार?
निलेश राणेंच्या ट्विटमुळे पुन्हा एकदा राणे आणि शिवसेना असा सामना रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान, आज जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या समर्थनार्थ आणि निलेश राणेंच्या कृत्याचा निषेध नोंदवण्यासाठी शिवसैनिक राणेंचा पुतळा जाळणार असल्याचेही शिवसेनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details