महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावात गरजूंसाठी 'शिवभोजन' योजना ठरली तारणहार - कडक लॉकडाऊन

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत 15 एप्रिलपासून विशेष निर्बंध लागू करण्यात आले आहे. या काळात कोणीही गरीब व गरजू व्यक्ती उपाशी राहू नये, म्हणून राज्य शासनाने राज्यात शिवभोजन थाळी मोफत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. या निर्णयाचा जळगाव जिल्ह्यातील गरजूंना चांगलाच फायदा झाला असून, निर्बंध काळात जिल्ह्यात 94 हजार 857 लाभार्थ्यांनी शिवभोजन थाळीचा मोफत लाभ घेतला आहे.

गरजूंसाठी 'शिवभोजन' योजना ठरली तारणहार
गरजूंसाठी 'शिवभोजन' योजना ठरली तारणहार

By

Published : May 5, 2021, 7:20 PM IST

जळगाव -कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत 15 एप्रिलपासून विशेष निर्बंध लागू करण्यात आले आहे. या काळात कोणीही गरीब व गरजू व्यक्ती उपाशी राहू नये, म्हणून राज्य शासनाने राज्यात शिवभोजन थाळी मोफत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. या निर्णयाचा जळगाव जिल्ह्यातील गरजूंना चांगलाच फायदा झाला असून, निर्बंध काळात जिल्ह्यात 94 हजार 857 लाभार्थ्यांनी शिवभोजन थाळीचा मोफत लाभ घेतला आहे.

शिवभोजनथाळीची सर्वप्रथम योजना जळगावात

राज्यातील गरीब आणि गरजूंसाठी शिवभोजन थाळी योजना राबविण्याचा महत्वाकांक्षी निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 1 जानेवारी 2020 रोजी घेतला. त्यानुसार जळगावमध्ये ही योजना सर्वप्रथम राबवण्यात आली. 26 जानेवारी 2020 रोजी या योजनेचा शुभारंभ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. सुरुवातीला जिल्ह्यासाठी 700 थाळ्यांचे उद्दिष्ट शासनाकडून देण्यात आले होते. त्यानंतर फेब्रुवारी 2020 मध्ये हा आकडा दुप्पट म्हणजेच 1400 थाळी इतका करण्यात आला. तर शासनाच्या 26 मार्च, 2020 च्या परिपत्रकानुसार तालुका स्तरावर शिवभोजन योजनेचा विस्तार करण्यात येऊन जिल्ह्याचा आकडा 3 हजार 500 थाळींपर्यंत वाढविण्यात आला. शासनाने टप्प्याटप्प्याने उद्दिष्टाबरोबरच क्षेत्राचा देखील विस्तार करून ही योजना तालुकास्तरावर कार्यान्वित केली.

जिल्ह्यात कार्यरत आहेत 38 केंद्र
जळगाव जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण 38 शिवभोजन केंद्र कार्यरत आहेत. त्यापैकी शहरी भागात 16 व ग्रामीण भागात 22 केंद्र आहेत. शहरी भागात 16 केंद्रामधून 1 हजार 250 थाळ्या तसेच ग्रामीण भागात 22 केंद्रामधून 2 हजार 175 थाळ्या वितरित करण्यात येतात. शिवभोजन ॲपवर प्रत्येक लाभार्थ्याचा फोटो व लाभार्थ्याचे पूर्ण नाव याची नोंद घेण्यात येते. लाभार्थ्यांना वरण, भात, एक भाजी आणि दोन चपाती एका थाळीमध्ये देण्यात येत आहे.

दररोज 5 हजार 125 थाळ्यांचे वितरण
‘ब्रेक द चेन’ अंतर्गत 15 एप्रिल 2021 पासून विशेष निर्बंध लागू असल्याने शासनाने एक महिना कालावधीसाठी शिवभोजन केंद्रांचा आकडा दीडपटीने वाढवून दिला आहे. त्यानुसार जिल्ह्यात कार्यरत असलेल्या 38 शिवभोजन केंद्रांना इष्टांक दीडपटीने वाढवून दिल्याने याचा लाभ जिल्ह्यातील हजारो लाभार्थ्यांना दररोज होत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात दररोज 5 हजार 125 थाळ्यांचे वितरण सुरू आहे. शिवभोजन केंद्रात मिळणारी थाळी यापूर्वी 10 रुपयांना मिळत होती. जास्तीत जास्त गरीब व गरजूंना लाभार्थ्यांना याचा लाभ मिळावा यासाठी मागील लॉकडाऊन कालावधीपासून शासनाने एका थाळीसाठी केवळ 5 रुपये किंमत ठेवली होती. आता विशेष निर्बंध कालावधीमुळे एक महिना ही थाळी पूर्णपणे मोफत देण्यात येत आहे. याचा लाभ जिल्ह्यातील हजारो गरीब आणि गरजू दररोज घेत असून, निर्बंध कालावधीत जिल्ह्यात या मोफत शिवभोजन थाळीचा लाभ 94 हजार 857 लाभार्थ्यांनी घेतला आहे. तर राज्यात शिवभोजन थाळी योजना कार्यान्वित झाल्यापासून आजपर्यंत 12 लाख 95 हजार 450 लाभार्थ्यांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला आहे.

कोरोना नियमांचे काटेकोरपने पालन
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रांमध्ये लाभार्थ्यांना पार्सल स्वरुपात जेवण देण्यात येत आहे. केंद्राच्या आवारात सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपने पालन करावे, सॅनिटायझरचा वापर करावा लाभार्थींची संख्या वाढल्यास रांगा करून दोन ग्राहकात आवश्यक अंतर (किमान 6 फूट) ठेवावे. त्यानुसार जमिनीवर मार्किंग करणे, केंद्र चालक आणि केंद्रांमध्ये काम करणारे कर्मचारी यांनी आणि लाभार्थ्यांनी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले असून तशा सूचना जिल्ह्यातील शिवभोजन केंद्र चालकांना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा -कोरानाची तिसरी लाट टाळणे शक्य नाही- केंद्र सरकारच्या प्रमुख वैज्ञानिक सल्लागारांचा इशारा

ABOUT THE AUTHOR

...view details