जालना जळगाव पोलिस ( Jalgaon Police ) अधिकाऱ्याच्या कथित ओडिओ क्लिप नंतर जालन्यातील विभागीय पोलिस अधिकाऱ्याची व्हिडीओ क्लिप व्हायरल ( Video clip viral )होत आहे. यामुळे नवा वाद उफळण्याची शक्यता आहे.
व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरलपरतूर तालुक्यातील आष्टी गावातील सामाजिक सभागृहाच्या वादातून ग्रामपंचयात कार्यालयात सामजिक कार्यकर्ते आणि ग्रामसेवक यांच्या परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या होते. शासकीय कामात अडथळा निर्माण केला, म्हणून ग्रामसेवक यांच्याकडून आष्टी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या विरुद्ध सामजिक कार्यकर्त्यांकडून ग्रामसेवक यांच्या विरुद्ध अँट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी दोन दिवसांपूर्वी एका सामाजिक संघटनेकडून आंदोलन करण्यात आले होते. याच्या कार्यक्रम दरम्यान व्यासपीठावर जाऊन विभागीय पोलिस अधिकारी मोरे यांनी केलेल्या भाषणाची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास या अधिकाऱ्याकडून काढून घेऊन निष्पक्ष अधिकाऱ्याकडून करावा, अशी मागणी संभाजी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.