जळगाव - जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग अतिशय वेगाने सुरू आहे. शुक्रवारी दिवसभरात पुन्हा नवे 982 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले आहेत. चिंतेची बाब म्हणजे, एकीकडे मोठ्या संख्येने बाधित रुग्ण आढळत असताना, दुसरीकडे कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची संख्या वाढतच आहे. शुक्रवारी दिवसभरात 5 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला.
जळगाव जिल्हा प्रशासनाला शुक्रवारी रात्री 4 हजार 576 तपासणी अहवाल प्राप्त झाले. त्यातील 982 अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंतच्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एकूण 68 हजार 662 इतकी झाली आहे. शुक्रवारी 512 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. तर आजपर्यंत 60 हजार 517 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.
जळगाव जिल्ह्यात पुन्हा 982 नवे कोरोना पॉझिटिव्ह; 5 जणांचा मृत्यू - जळगाव कोरोना अपडेट न्यूज
जळगाव जिल्हा प्रशासनाला शुक्रवारी रात्री 4 हजार 576 तपासणी अहवाल प्राप्त झाले. त्यातील 982 अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंतच्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एकूण 68 हजार 662 इतकी झाली आहे.
हेही वाचा-मनसुख हिरेन यांचा मृतदेह खाडीमधून बाहेर काढणाऱ्याचा एटीएसने घेतला जवाब
सक्रिय रुग्णसंख्या 6 हजार 713 वर
जळगाव जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 6 हजार 713 वर पोहचली आहे. त्यात 5 हजार 331 रुग्णांना कोरोनाची लक्षणे नाहीत, तर 1 हजार 382 रुग्णांना लक्षणे आहेत. जिल्ह्यातील 4 हजार 624 रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहेत.
हेही वाचा-मी क्राईम ब्रांचमधून मुक्त झालो - सचिन वझे
जळगावात पुन्हा आढळले त्रिशतकी रुग्ण-
जळगाव शहरातील परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे. शहरात कोरोनाचा संसर्ग काही केल्या थांबत नसल्याचे चित्र आहे. शुक्रवारी जळगावात पुन्हा त्रिशतकी संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले. तब्बल 363 रुग्ण एकट्या जळगाव शहरातून आढळले आहेत. भुसावळ तालुक्यातदेखील विक्रमी 198 रुग्ण आढळले. तर चाळीसगाव तालुक्यात 142 रुग्णांची भर पडली आहे.