जळगाव -जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत शुक्रवारी पुन्हा 3 कोरोनाबाधितांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 235 इतकी झाली आहे. नव्याने पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण हे जळगाव, अमळनेर आणि पाचोरा शहरातील आहेत.
जळगाव जिल्ह्यात 3 कोरोनाबाधितांची भर; एकूण रुग्णसंख्या झाली 235 - जळगाव कोरोना अपडेट
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 235 इतकी झाली असून त्यापैकी 35 व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी गेल्या आहेत. तर 28 कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील जळगाव, भुसावळ, चोपडा, अमळनेर, पाचोरा येथील स्वॅब घेतलेल्या 52 कोरोना संशयित व्यक्तींचे स्वॅब नमुना तपासणी अहवाल शुक्रवारी सायंकाळी प्राप्त झाले. यापैकी 49 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून 3 व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील माता आश्रम येथील एक, अमळनेर येथील मराठे गल्लीतील एक, आणि पाचोरा येथील एक अशा 3 रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 235 इतकी झाली असून त्यापैकी 35 व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी गेल्या आहेत. तर 28 कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
कोरोना अपडेट-
अमळनेर 105 (कोरोनामुक्त 17)
भुसावळ 41 (कोरोनामुक्त 9)
जळगाव 45 (6 कोरोनामुक्त)
पाचोरा 21 (3 कोरोनामुक्त)
चोपडा 14 (शहर 9, अडावद 5)
मलकापूर 1
यावल 2 (शहर 1, फैजपूर 1)
भडगाव 6 (शहर 4, 2 निंभोरा)
जिल्ह्यातील एकूण मृत्यूसंख्या 28
जळगाव 4
अमळनेर 10
भुसावळ 8
चोपडा 3 (शहर 1, अडावद 2)
पाचोरा 3