महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यात मंगळवारी आढळले 22 कोरोना पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या 490 वर - corona reports jalgaon

मंगळवारी दिवसभरात जिल्हा प्रशासनाला चार टप्प्यात कोरोना संशयित रुग्णांच्या स्वॅबचे अहवाल प्राप्त झाले.

jalgaon corona news
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव

By

Published : May 27, 2020, 7:51 AM IST

जळगाव -जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. मंगळवारी दिवसभरात जिल्हा प्रशासनाला चार टप्प्यात प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये तब्बल 22 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.

जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता पाचशेच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये 22 नव्या रुग्णांची भर पडली. नव्याने आढळलेले रुग्ण हे जळगाव शहर अमळनेर, यावल, रावेर, भुसावळ, चाळीसगाव येथील आहेत. त्यात सर्वाधिक 11 रुग्ण हे जळगाव शहरातील असून त्यानंतर अमळनेर 3, रावेर 1, यावल तालुक्यातील 4, भुसावळ 2, चाळीसगाव 1 अशा रुग्णांचा समावेश आहे.

मंगळवारी दिवसभरात जिल्हा प्रशासनाला चार टप्प्यात कोरोना संशयित रुग्णांच्या स्वॅबचे अहवाल प्राप्त झाले. पहिल्या टप्प्यात 3, दुसऱ्या टप्प्यात 4, तिसऱ्या टप्प्यात 7 तर चौथ्या टप्प्यात 8 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, जळगाव शहरात सध्या कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळतोय. शहरात दररोज नव्या रुग्णांची मोठ्या संख्येने भर पडत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण वाढला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details