जळगाव - जिल्ह्यात आगामी जिल्हा परिषद आणि नगर परिषद निवडणुकींच्या ( Jalgaon Local Body Election 2022 ) पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून भाजपचा कार्यकर्ता मेळाव्या नंतर दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही पाचोऱ्यात भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन ( NCP Public Meeting ) करून पक्ष बळकट करण्यास सुरुवात केली आहे.
पाचोरा येथील राष्ट्रवादीचा मेळावा आणि प्रतिक्रिया पाचोऱ्यात राष्ट्रवादीचा मेळावा -
पाचोरा येथे राष्ट्रवादीचे नेते तथा जळगाव जिल्हा पक्ष निरीक्षक अविनाश आदिक, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात अविनाश आदिक यांनी कार्यकर्त्यांना स्वबळावर निवडणुक लढण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान जिल्ह्यातही आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्ष स्वबळावर लढण्यासाठी सज्ज असल्याचे मत राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी व्यक्त केले आहे.
हे आहेत प्रमुख मुद्दे -
- बोदवड नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीत झालेल्या बिघाडीचा आगामी निवडणुकींवर परिणाम?
- जळगावात आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील पक्ष स्वबळाचा मार्गावर
- जळगावातील पाचोरा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या भव्य कार्यकर्ता मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते अविनाश आदिक यांच्या उपस्थितीत माजी आमदार दिलीप वाघ यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचे केले जाहीर.
हेही वाचा -देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर चप्पल भिरकवल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल