महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाडळसे प्रकल्प निधी : अमळनेरात राष्ट्रवादीकडून गिरीश महाजनांचे पोस्टर जाळले - padalse

राजकीय अनास्थेमुळे हा प्रकल्प २० वर्षांपासून रखडलेला आहे. या प्रकल्पाची आज किंमत २ हजाप ७५१ कोटींच्या घरात गेली आहे.

अमळनेरात राष्ट्रवादीकडून गिरीश महाजनांचे पोस्टर जाळले

By

Published : Mar 1, 2019, 5:29 PM IST

जळगाव - राज्याच्या अर्थसंकल्पात अमळनेर तालुक्यातील पाडळसे येथील निम्न तापी प्रकल्पासाठी केवळ ३२ कोटी ५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद खूपच अत्यल्प आहे. गेल्या २० वर्षांपासून राजकीय अनास्थेमुळे हा प्रकल्प रेंगाळला आहे. या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अमळनेरात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे पोस्टर जाळून शासनाचा निषेध करण्यात आला.

अमळनेरात राष्ट्रवादीकडून गिरीश महाजनांचे पोस्टर जाळले

अमळनेर तालुक्‍यातील पाडळसे निम्न तापी प्रकल्पाचे काम अपूर्ण स्थितीत आहे. या प्रकल्पाला सुरुवातीला प्रशासकीय मान्यता मिळाली होती. तेव्हा त्याची किंमत १४० कोटी रुपये होती. मात्र, राजकीय अनास्थेमुळे हा प्रकल्प २० वर्षांपासून रखडलेला आहे. या प्रकल्पाची आज किंमत २ हजाप ७५१ कोटींच्या घरात गेली आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शासनाने भरीव निधी उपलब्ध करून देण्याची गरज असताना शासनाने अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी केवळ ३२ कोटी ५० लाखांची तरतूद केली. हा तालुकावासीयांवर अन्याय असल्याने शासनाचा निषेध नोंदवण्यासाठी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे पोस्टर जाळण्यात आले.

गिरीश महाजन यांच्याकडे जलसंपदा हे महत्त्वाचे खाते आहे. मात्र, पाडळसे प्रकल्पासाठी निधी आणण्यात ते अपयशी ठरले आहेत. यामुळे आम्ही शासनाचा निषेध नोंदवत असल्याचे राष्ट्रवादीच्या आंदोलकांनी सांगितले. अमळनेर तालुक्यातील दोन्ही विद्यमान आमदार याप्रश्नी अपयशी ठरले आहेत, अशी टीकाही यावेळी करण्यात आली. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या तिलोत्तमा पाटील, तालुकाध्यक्ष सचिन पाटील, योजना पाटील, संजय पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आंदोलकांनी फडणवीस सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details