जळगाव -भाजप कार्यालयात बुधवारी स्थायी व महासभेच्या नियोजनासाठी झालेल्या पक्षाच्या बैठकीत मनपा अधिकारी उपस्थित राहिले होते. त्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा अधिकाऱ्यांना भाजपचा गमछा घालत या कृतीचा अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला. नागरिकांच्या समस्यांकडे वेळ द्यायला अधिकाऱ्यांकडे वेळ नसतो आणि भाजपच्या बैठकींना हजेरी लावण्यासाठी अधिकाऱ्यांकडे वेळ कसा मिळतो? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी उपस्थित केला.
माहिती देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील हेही वाचा -'पक्ष कार्यालयात बोलावून अधिकाऱ्यांना दिली जाते अपमानास्पद वागणूक'
संबधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा
महापालिकेच्या स्थायी समितीची सभा संपल्यानंतर मनपाच्या सभागृहाच्या प्रवेश व्दाराजवळच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या बैठकीत हजेरी लावणाऱ्या अधिकाऱ्यांना थांबवून त्यांना भाजपचा गमछा घातला. नगररचना विभागाचे अभियंता शकील शेख, शहर अभियंता अरविंद भोसले यांना थांबवून भाजपचा गमछा घालण्यात आला. प्रतिकात्मकरित्या भाजपमध्ये प्रवेश करून, अधिकाऱ्यांनी भाजप पक्ष कार्यालयात उपस्थित राहिल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, भाजपच्या दावणीला बांधल्यासारखे काम न करता जनतेच्या कामांना वेळ द्या, तसेच याबाबत संबधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी देखील राष्ट्रवादीकडून करण्यात आली.
हेही वाचा -जळगावच्या कनाशीत आईसह दोन लेकरांचे विहिरीत आढळले मृतदेह