जळगाव - तौक्ते चक्रीवादळामुळे गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. गुजरातमध्ये नुकसान झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लगेचच पाहणी दौरा करत एक हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली. मात्र, महाराष्ट्रात त्यांनी दौराही केला नाही आणि मदतही जाहीर केली नाही. हा महाराष्ट्रावर एकप्रकारे अन्यायच आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी मोदींवर टीका केली आहे.
गुजरातला लगेचच मदत आणि महाराष्ट्राला नाही, हा अन्यायच; एकनाथ खडसेंची टीका - जळगाव राष्ट्रवादीचे नेते खडसे
राज्यातील नागरिकांना मदत करणे ही राज्याची जबाबदारी आहे. राज्य सरकार सध्या आढावा घेत आहे. त्यानंतर मदत करेल. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये जाऊन मदतीची घोषणा करतात. त्यामुळे महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. माझी मोदींना विनंती आहे, त्यांना महाराष्ट्राला जी काही मदत करायची असेल ती लवकर करावी, असेही खडसे म्हणाले.
एकनाथ खडसे सोमवारी जळगावात आलेले होते. कार्यकर्त्यांच्या भेटी-गाठी घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी ते बोलत होते. खडसे पुढे म्हणाले, ज्याचे नुकसान होते, तो शेवटी देशाचा नागरिक आहे. त्याला राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून मदतीची अपेक्षा असते. राज्यातील नागरिकांना मदत करणे ही राज्याची जबाबदारी आहे. राज्य सरकार सध्या आढावा घेत आहे. त्यानंतर मदत करेल. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये जाऊन मदतीची घोषणा करतात. त्यामुळे महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. माझी मोदींना विनंती आहे, त्यांना महाराष्ट्राला जी काही मदत करायची असेल ती लवकर करावी, असेही खडसे म्हणाले.
केंद्राने आवश्यक त्या औषधांचा पुरवठा करावा-
सध्या राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा नाही. परंतु, म्युकर मायकोसिस आजाराचे रुग्ण वाढत आहेत. अशा परिस्थितीत रुग्णांना अँफोटेरेसीन बी इंजेक्शनची गरज भासत आहे. या औषधासाठी परदेशातून कच्चा माल मागवावा लागतो. केंद्राकडून त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील रुग्णांसाठी आवश्यक तो औषधांचा पुरवठा झाला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.