महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह - corona breaking news

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे.

एकनाथ खडसे
एकनाथ खडसे

By

Published : Feb 18, 2021, 5:13 PM IST

जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती त्यांनी स्वतः ट्विटर हँडलवर ट्वीट करून दिली आहे. दरम्यान, खडसेंना यापूर्वीही कोरोना झाला होता. तेव्हा ते उपचार घेऊन कोरोनातून बरे झाले होते. आता त्यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे.

एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. परंतु, सौम्य लक्षणे असल्याने ते घरीच विलगीकरणात आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून, ते वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत आहेत.

ट्वीटरवरून दिली माहिती-

एकनाथ खडसे यांनी आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती ट्विटरवरून दिली आहे. 'माझी कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली असून, माझी तब्येत चांगली आहे. काळजीचे कारण नाही. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, अशी मी विनंती करतो', असे आवाहन खडसेंनी ट्वीट करत केले आहे.

एकनाथ खडसे दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह
सुनेलाही कोरोनाची लागण-
दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या सून भाजप खासदार रक्षा खडसे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आजच त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. रक्षा खडसे यांच्यानंतर एकनाथ खडसे हे कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत.

मंत्री जयंत पाटलांचा दौरा चिंता वाढवणारा-

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे काही दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. राष्ट्रवादी परिसंवाद यात्रेच्या निमित्ताने त्यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी जाहीर मिळावे आणि आढावा बैठका घेतल्या. यावेळी जयंत पाटील यांच्यासोबत खडसे यांची उपस्थिती होती. जयंत पाटील हेदेखील कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यानंतर खडसेंनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली आहे. एकंदरीतच जयंत पाटील यांचा दौरा चिंता वाढवणारा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details