जळगाव:चेक पोस्टवर ओव्हरलोड वाहनधारकांकडून अवैधरित्या पैसे वसुली होत असल्याचा एकनाथ खडसेंचा आरोप आहे. यापूर्वीही चेक पोस्ट नाक्या विरोधात एकनाथ खडसे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. मात्र याबाबत चौकशी होऊनही चेक पोस्ट नाक्यावर अवैधरित्या पैसे वसूल होत असल्याने पुन्हा या संदर्भात विधान परिषदेत आवाज उठवणार असल्याची एकनाथ खडसेंनी माहिती दिली आहे.
Eknath Khadse Protested: महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवरील आरटीओ चेक पोस्ट नाक्यावर एकनाथ खडसे यांचा तब्बल 3 तास ठिय्या ! - विधान परिषदेत आवाज उठवणार
Eknath Khadse Protested: चेक पोस्टवर ओव्हरलोड वाहनधारकांकडून अवैधरित्या पैसे वसुली होत असल्याचा एकनाथ खडसेंचा आरोप आहे. यापूर्वीही चेक पोस्ट नाक्या विरोधात एकनाथ खडसे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. मात्र याबाबत चौकशी होऊनही चेक पोस्ट नाक्यावर अवैधरित्या पैसे वसूल होत असल्याने पुन्हा या संदर्भात विधान परिषदेत आवाज उठवणार असल्याची एकनाथ खडसेंनी माहिती दिली आहे.
विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होतामुक्ताईनगर बऱ्हाणपूर मार्गावरील महाराष्ट्र मध्यप्रदेश सीमेवर असलेल्या आरटीओ चेक पोस्ट नाक्यावर वाहनधारकांकडून अवैधरीत्या पैसे वसुली होत असल्याचा आरोप करत एकनाथ खडसे यांनी चेक पोस्ट नाक्यावर तब्बल तीन तास ठिय्या मांडला आहे. यापूर्वीही या चेक पोस्ट नाक्या बाबत एकनाथ खडसे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता.
प्रशासनाला चांगलेच धारेवर धरलेत्यानंतर याबाबत चौकशी देखील करण्यात आली होती. मात्र चौकशी होऊ नये, या चेक पोस्ट नाक्यावर अवैधरित्या वाहनधारकांकडून पैसे वसुली होत असल्याने एकनाथ खडसे यांनी चेक पोस्ट नाका गाठून तब्बल 3 तास ठिय्या मांडत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले आहे. तर यावेळी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची देखील चांगलीच तारांबळ उडाली आहे.