महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 3, 2022, 4:19 PM IST

Updated : Mar 3, 2022, 5:23 PM IST

ETV Bharat / state

Eknath Khadse On BJP : भाजपचे दहशतवाद्यांशी संबंध; एकनाथ खडसे यांचा गंभीर आरोप

नवाब मलिक यांचे दाऊदशी संबंध असल्याचा आरोप करत भाजपने नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान, भाजपचाच दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी ( Ekanath Khadase On BJP ) केला आहे. दहशतवादावर नाक मुरडणाऱ्या भाजपला पार्टी फंड देणारा इक्बाल मिरची हा दहशतवादी असल्याचा आरोप करत थेट भाजपवरही निशाणा साधला आहे. तर दाऊदच्या नातेवाईकांसोबतच भाजप नेते गिरीश महाजन यांनी एकत्र बसून जेवण केल्याचा धक्कादायक आरोप एकनाथ खडसे यांनी ( NCP Leader Eknath Khadse Allegations on BJP Leaders ) केला आहे.

Eknath Khadse On BJP
एकनाथ खडसे

जळगाव - नवाब मलिक यांचे दाऊदशी संबंध असल्याचा आरोप करत भाजपने नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान, भाजपचाच दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी ( Ekanath Khadase On BJP ) केला आहे. दहशतवादावर नाक मुरडणाऱ्या भाजपला पार्टी फंड देणारा इक्बाल मिरची हा दहशतवादी असल्याचा आरोप करत थेट भाजपवरही निशाणा साधला आहे. तर दाऊदच्या नातेवाईकांसोबतच भाजप नेते गिरीश महाजन यांनी एकत्र बसून जेवण केल्याचा धक्कादायक आरोप एकनाथ खडसे यांनी ( NCP Leader Eknath Khadse Allegations on BJP Leaders ) केला आहे.

राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया

खडसेंनी विरोधी पक्षासह महाविकास आघाडीला फटकारले -

राज्यपाल आपल्या अभिभाषण अर्धवट सोडून निघून गेल्याची घटना पहिल्यांदाच महाराष्ट्राचा इतिहास घडली आहे. भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी अर्वाच्य घोषणा दिल्याची बातमी समोर आली, मात्र माझा मते दोन्ही बाजूने घोषणा प्रतिघोषणा झाल्या व या गदारोळामुळे राज्यपालांना आपले अभिभाषण संपवावे लागले. राज्यपालांचे अभिभाषण झाल्यानंतर जे काही राजकारण करायचे होते ते केले असते, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी विरोधकांसह सत्ताधाऱ्यांना फटकारले आहे.

'सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासंदर्भात दिलेला निर्णय अत्यंत दुर्दैवी'

सर्वोच्च न्यायालयाने उभीच आरक्षणासंदर्भात दिलेला निर्णय अत्यंत दुर्दैवी असून राज्य मागासवर्गीय आयोगाने सादर केलेला अहवाल सर्वोच्च न्यायालयाने अमान्य केला आहे. मात्र, अजूनही याचा सखोलपणे अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. आरक्षणासंदर्भात ओबीसींचा वाटा मिळायलाच पाहिजे. दुर्दैवाने राज्य सरकार कमी पडले असून केंद्र सरकारने इम्पेरियल डाटा राज्य सरकारला दिला असता तर तीन महिन्यात मागासवर्गीय आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी जी कसरत करावी लागली. ती करावी लागली नसती. मात्र राज्य मागासवर्ग आयोगाने सादर केलेला अहवाल दुर्दैव आणि सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारला असल्याने हा ओबीसींवर अन्याय असल्याचे मत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे. तसेच जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नये अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे.

हेही वाचा -Maharashtra Budget Session 2022 : राज्यपालांनी मध्येच सोडले अभिभाषण, महाराष्ट्र विधिमंडळात पहिल्यांच घडली घटना

Last Updated : Mar 3, 2022, 5:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details