महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चंद्रकांत पाटील कधीही ठाम नसतात, त्यांची मते दररोज बदलतात -एकनाथ खडसे यांनी काढला चिमटा - चंद्रकांत पाटील यांच्या टीका

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी 'आम्हाला वाघाशी मैत्री करायला आवडेल', असे वक्तव्य केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना आज एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटलांना चिमटा काढला. ते म्हणाले, 'चंद्रकांत पाटील मतावर कधीही ठाम नसतात. त्यांची मते दररोज बदलत असतात.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे

By

Published : Jun 10, 2021, 1:37 PM IST

Updated : Jun 10, 2021, 1:52 PM IST

जळगाव -भाजप नेते चंद्रकांत पाटील हे आपल्या मतावर कधीही ठाम नसतात. त्यांची मते दररोज बदलत असतात, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी चिमटा काढला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज वर्धापन दिन साजरा होत आहे. एकनाथ खडसे गुरुवारी सकाळी जळगावात आले होते. पक्षाच्या जिल्हा कार्यालयात आयोजित कार्यक्रमाला उपस्थिती लावल्यानंतर ते आपल्या मुक्ताई निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते.

एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटलांना चिमटा काढला

नेमकं काय म्हणाले खडसे?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षण प्रश्नी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्यानंतर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी 'आम्हाला वाघाशी मैत्री करायला आवडेल', असे वक्तव्य केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना आज एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटलांना चिमटा काढला. ते म्हणाले, 'चंद्रकांत पाटील मतावर कधीही ठाम नसतात. त्यांची मते दररोज बदलत असतात. त्यांनी आजपर्यंत ठामपणे भूमिका घेतलेली नाही. आता सांगितले, नंतर बदलले, असा आजवरचा माझा अनुभव राहिला आहे. त्यांना मैत्री करायची असेल तर त्यांनी करावी, त्यांच्याकडे जावे', असे खडसेंनी सांगितले.

राष्ट्रवादी पक्ष आता तारुण्यात-

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आजवर 22 वर्षांच्या वाटचालीत अनेक चढउतार अनुभवले आहेत. पक्षाच्या वाटचालीवर नजर टाकली तर सर्वांनी पक्ष विस्तारासाठी परिश्रम घेतल्याचे दिसून येते. परंतु, अजूनही पक्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. पक्षाची वाटचाल 22 वर्षांची झाली आहे, म्हणजे पक्ष आता तारुण्यात आला आहे. कार्यकर्त्यांनी पक्ष अधिकाधिक लोकांपर्यंत जावा म्हणून प्रयत्न करायला हवेत, असे आवाहनही त्यांनी केली.

Last Updated : Jun 10, 2021, 1:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details