महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'गिरीश महाजनांच्या गैरव्यवहाराची फाईल मिळवण्यासाठी पोलिसांकडून माझ्या घराची बेकायदेशीर झडती'

प्रफुल्ल लोढा यांनी आज सायंकाळी जळगावात पत्रकार परिषद घेऊन आपल्यावर अन्याय झाल्याचा दावा केला. यावेळी त्यांनी भाजप नेते गिरीश महाजन, त्यांचे स्वीय सहायक रामेश्वर नाईक, जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी तसेच माजीमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर आरोप केले. लोढा यांनी केलेल्या आरोपांमुळे जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

जळगाव
जळगाव

By

Published : Dec 25, 2020, 9:16 PM IST

जळगाव- बीएचआर घोटाळ्याशी माझा काहीही संबंध नाही. मात्र, तरीही पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने भाजपचे माजीमंत्री गिरीश महाजनांच्या गैरव्यवहाराची फाईल मिळवण्यासाठी बेकायदेशीररित्या माझ्यासह मित्राच्या घरी झाडाझडती केली, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे जामनेरचे कार्यकर्ते प्रफुल्ल लोढा यांनी आज केला. धक्कादायक म्हणजे, या प्रकरणामागे त्यांनी थेट स्वकीय नेते एकनाथ खडसे हे असल्याचा आरोप केला. एकनाथ खडसे यांनी आपल्याला राजकीय स्वार्थापोटी त्रास दिल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

जळगाव

प्रफुल्ल लोढा यांनी आज सायंकाळी जळगावात पत्रकार परिषद घेऊन आपल्यावर अन्याय झाल्याचा दावा केला. यावेळी त्यांनी भाजप नेते गिरीश महाजन, त्यांचे स्वीय सहायक रामेश्वर नाईक, जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी तसेच माजीमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर आरोप केले. लोढा यांनी केलेल्या आरोपांमुळे जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

न्यायालयात दाद मागणार:

प्रफुल्ल लोढा पुढे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या काळात आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून पक्षात नवचैतन्य निर्माण करण्याचे काम केले. परंतु, एकनाथ खडसे यांच्या जोडीला असलेल्या पारस ललवाणी यांनी मला धमकावून माझ्यावर इन्कम टॅक्सची रेड करेल, माझ्यासह माझ्यावर प्रेम करणाऱ्या स्त्रीचे फोटो व्हायरल करेल, अशी धमकी दिली. गिरीश महाजन यांच्या गैरव्यवहारांची फाईल मिळवण्यासाठी पोलिसांनी बेकायदेशीरपणे घरझडती घेत झालेल्या अन्यायाची दाद मी आता न्यायालयात मागणार आहे, असे लोढा यांनी सांगितले.

पोलिसांनी कुटुंबीयांना धमकावले:

बीएचआर पतसंस्थेच्या घोटाळ्याशी माझा मित्र सुनील कोचर (रा. सिल्लोड) व माझ्या चुलत भावाची पत्नी मनीषा अजय लोढा (रा. मुंबई) यांचा कोणताही संबंध नाही. तरी खडसे व ललवाणी यांनी माझ्याकडे असलेली गिरीश महाजन व रामेश्वर नाईक यांच्या गैरकृत्याची फाईल शोधण्यासाठी माझ्याकडे व माझ्या चुलत भावाकडे बीएचआर पतसंस्थेच्या नावाखाली घरझडती घेण्यात आली. २७ नोव्हेंबर रोजी सर्च वॉरंट काढून ही झाडाझडती घेतली. तर १ डिसेंबरला कुठलेही सर्च वॉरंट नसताना घरझडती घेण्यासाठी आलेले आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी माझ्या परिवारातील लोकांना धमकावत होते व अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत होते. न्यायालयाची परवानगी नसताना सहा ते आठ तास कोचर यांच्या घरात आर्थिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी व पारस ललवाणीने गोंधळ घातला. तसेच मोबाईलमधील संभाषण अधिकाऱ्यांनी उडवले, असा दावाही लोढा यांनी केला.

निखिल खडसेंच्या मृत्यूची चौकशी व्हावी:

या विषयाची संपूर्ण चौकशी व्हावी, यासाठी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रपती, राज्यपाल यांच्याकडे दाद मागणार आहे, असल्याचेही लोढा म्हणाले. लोढा यांनी यावेळी खडसे यांच्यावरही अनेक गंभीर आरोप लावले. खडसेंचे पूत्र दिवंगत निखिल खडसे यांचा मृत्यू संशयास्पद आहे. त्यांच्या मृत्यूची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करत लोढा यांनी याबाबत आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले. दरम्यान या विषयासंदर्भात एकनाथ खडसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मद्य प्राशन करून केलेल्या आरोपांना आपण महत्त्व देत नसल्याची प्रतिक्रिया खडसे यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details