जळगाव -राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यातील ११ पैकी ७ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये आघाडी झाली आहे. आघाडीच्या जागा वाटपाच्या सूत्रानुसार राष्ट्रवादी काँग्रेस ९ तर काँग्रेस २ जागा लढवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीत ७ मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव जिल्ह्यातील ७ जागांवरचे उमेदवार जाहीर हे ही वाचा -राष्ट्रवादीची ७७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; रोहित पवारांचा समावेश
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीत ७७ उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील जळगाव ग्रामीण पुष्पा ज्ञानेश्वर महाजन, चोपडा जगदीश वळवी, अमळनेर अनिल भाईदास पाटील, जामनेर संजय गरुड, ,चाळीसगाव राजीव देशमुख, पाचोरा दिलीप वाघ आणि एरंडोलमधून विद्यमान आमदार डॉ. सतीश पाटील या ७ उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला असलेल्या २ जागांवर अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत.
हे ही वाचा -निष्ठावान कार्यकर्त्याचे नेत्यावरील प्रेम; 10 रुपयांची नाणी साठवून 5 हजार रुपये दिले अर्ज भरायला
राष्ट्रवादी काँग्रेसचे ७ मतदारसंघातील उमेदवार जाहीर झाल्याने सरळ लढती रंगणार आहेत. त्यात अमळनेरमध्ये भाजपचे शिरीष चौधरी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल पाटील, चाळीसगावात भाजपचे मंगेश चव्हाण विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे राजीव देशमुख, पाचोरा सेनेचे किशोर पाटील विरुद्ध राष्ट्रवादीचे दिलीप वाघ, जामनेरमध्ये भाजपचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन विरुद्ध राष्ट्रवादीचे संजय गरुड, जळगाव ग्रामीणमध्ये सेनेचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटलांविरुद्ध राष्ट्रवादीच्या पुष्पा महाजन, एरंडोलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. सतीश पाटील विरुद्ध सेनेचे चिमणराव पाटील तर चोपड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जगदीश वळवी यांच्या विरुद्ध सेनेच्या लता सोनवणे यांच्यात लढत होईल.