जळगाव- युवकांना २ कोटी रोजगार देऊ, वाढलेली महागाई कमी करू, सर्वसामान्य जनतेला अच्छे दिन आणू, अशी अनेक आश्वासने देऊन मोदी सरकार सत्तेत आले. परंतु, गेल्या साडेचार वर्षात मोदी सरकारने आश्वासने पूर्ण न करता जनतेची फसवणूक केली, असा आरोप करत जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसने पकोडे तळून मोदी सरकारचा निषेध केला.
मोदी सरकारच्या फसव्या आश्वासनांचा राष्ट्रवादीकडून पकोडे तळून निषेध - राष्ट्रवादी काँग्रेस
देशभरात वाढलेल्या बेरोजगारीच्या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनावेळी हातगाडीवर पकोडे तळून ते लोकांना वाटण्यात आले. मोदी सरकारविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
पकोडे तळताना राष्ट्रवादीचे पदाधिकारी
या आंदोलनात माजी मंत्री गुलाबराव देवकर, आमदार डॉ. सतीश पाटील, जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, महानगराध्यक्ष नामदेव चौधरी, जिल्हा बँकेचे संचालक अनिल भाईदास पाटील, महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील उपस्थित होते.
Last Updated : Feb 14, 2019, 12:24 PM IST