जळगाव -फ्रान्समध्ये कार्टून बनवून व अन्य प्रकारे वारंवार प्रेषितांचे अपमान होत असतानाच फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रान यांनी प्रेषितांच्या होत असलेला अपमान रोखण्यास असमर्थ असल्याची घोषणा करणे हे निंदनीय कृत्य असल्याचा आरोप करत जळगावातील सुन्नी मुस्लीम बांधवांनी मॅक्रान यांच्या प्रतिमेला पायदळी तुडवत त्यांच्या या कृत्याचा निषेध केला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले.
सुन्नी मुस्लिम बांधवांकडून फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रानचा निषेध - जळगाव मुस्लिमांचे आंदोलन बातमी
फ्रान्समध्ये कार्टून बनवून व अन्य प्रकारे वारंवार प्रेषितांचे अपमान होत असतानाच फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रान यांनी प्रेषितांच्या होत असलेला अपमान रोखण्यास असमर्थ असल्याची घोषणा केल्याच्या निषेधार्थ जळगावमध्ये मुस्लिम बांधवांकडून मॅक्रान यांचे फोटो पायदळी तूटवून जाळण्यात आले.
यावेळी संतप्त सुन्नी बांधवांनी मॅक्रान यांच्या निषधाच्या घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. सुन्नी जामा मस्जिद जळगाव, सुन्नी ईदगाह ट्रस्ट जळगावचे अध्यक्ष सय्यद अयाज अली नीयाज अली यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित सुन्नी मुस्लिम बांधवांनी मुर्दाबाद मुर्दाबाद मॅक्रान मुर्दाबाद ,अशा घोषणा दिल्या. याप्रसंगी मॅक्रान यांचे छायाचित्र असलेल्या पोस्टरला आपल्या पायात घेऊन पायदळी उडवण्यात आले. त्यानंतर त्यांच्या छायाचित्रांना जाळण्यात आले. त्यानंतर शिष्टमंडळाने भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून निवेदन दिले. यात आपल्या भारताने फ्रान्सशी असलेले सर्व संबंध संपुष्टात आणावे व फ्रान्स सरकारद्वारे सुरू असलेला प्रेषित साहेबांच्या अपमानाची मालिका लवकरात लवकर समाप्त करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे
यावेळी अयाज अली यांनी सांगीतले की, फ्रान्समध्ये कार्टून बनवून व अन्य प्रकारे वारंवार प्रेषितांचे अपमान होत आले आहे आणि आता तर फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रान यांनी सर्व सीमा ओलांडल्या आहेत. त्यांनी प्रेषितांच्या संदर्भात अपमानजनक घोषणा करत आम्ही प्रेषितांच्या होत असलेला अपमान रोखण्यास असमर्थ असल्याचे सांगत प्रेषितांचे अपमान करणाऱ्या वाईट लोकांचे धैर्य वाढवले आहे. हे अत्यंत निंदनीय व संतापजनक कृत्य आहे.
हेही वाचा -चाळीसगाव बाजार समितीत सोमवारपासून कांदा खरेदी होणार सुरू