महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Murder in Jalgaon : अनैतिक संबंधातून तरुणाचा खून; जळगाव पुन्हा हादरले - murder in jalgaon

आपल्या पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधातून मध्यरात्री तरुणाने संशयाच्या भरात एकाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार जळगावात आज उघडकीस आला. ( Murder over Immoral Relationship Jalgaon ) या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तत्काळ यातील आरोपी अमित खरे यास अटक करून न्यायालयात हजर केले.

dead man
मृत तरुण

By

Published : Mar 26, 2022, 4:19 PM IST

Updated : Mar 26, 2022, 5:42 PM IST

जळगाव -आपल्या पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधातून मध्यरात्री तरुणाने संशयाच्या भरात एकाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार जळगावात आज उघडकीस आला. ( Murder over Immoral Relationship Jalgaon ) या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तत्काळ यातील आरोपी अमित खरे यास अटक करून न्यायालयात हजर केले. जळगाव शहरातील समता नगर भागातील रहिवासी असणाऱ्या तरुणावर हा चाकूहल्ला करण्यात आला.

पोलीस अधीक्षक याबाबत माहिती देताना

उपचारादरम्यान मृत्यू -समता नगरात राहणारा सागर पवार याचे माझ्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. यामुळेच मीच सागरचा खून केल्याचा केला असल्याची माहिती पोलिसांना दिली. शहरातील समता नगर भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सागर पवार हा तरुण एकटाच वास्तव्यास होता. त्याच्यावर चाकूहल्ला केल्याने यात तो गंभीर जखमी झाला. त्याच्या किंचाळ्या ऐकून परीसरातील नागरिकांनी त्याला तातडीने रुग्णालयात हलविले. मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.याबाबत रामानंद नगर पोलीस स्थानकात आरोपी अमित खरे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा -Mumbai Rods close : मुंबईतील 13 रस्ते दर रविवारी घेणार मोकळा श्वास, पोलीस आयुक्तांची संकल्पना

Last Updated : Mar 26, 2022, 5:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details