जळगाव -जिल्ह्यातील भुसावळ शहर पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरले आहे. शुक्रवारी (दि. 7 मे) रात्रीच्या सुमारास एका तरुणाचा चाकूने वार करत निर्घृण खून झाला आहे. ही घटना आज (शनिवारी) सकाळी उघडकीस आली. या घटनेचे नेमके कारण मात्र स्पष्ट झालेले नाही.
सुनील अरुण इंगळे (वय 34 वर्षे, रा. भुसावळ), असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. भुसावळ शहरात एका तरुणाचा रात्री खून झाल्याची माहिती भुसावळ शहर पोलीस ठाण्याला मिळाली होती. त्या अनुषंगाने भुसावळचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब ठोंबे यांनी घटनास्थळाला भेट दिली. घटनास्थळी मृतावस्थेत असलेली व्यक्ती ही सुनील इंगळे असल्याची माहिती समोर आली.