महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यात पुन्हा 13 कोरोनाबाधित रुग्णांची भर; एकूण रुग्णसंख्या झाली 441

सद्यस्थितीत जळगाव, भुसावळ आणि अमळनेर येथील रुग्णसंख्या शतकपार गेली आहे. त्याचप्रमाणे भडगाव शहर आणि तालुका मिळून कोरोनाबाधित रुग्णसंख्या ही अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे.

जळगाव
जळगाव

By

Published : May 24, 2020, 7:16 PM IST

जळगाव - जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग काही केल्या कमी होत नसल्याचे पाहायला मिळत आहे. रविवारी जिल्ह्यात पुन्हा 13 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एकूण 441 इतकी झाली आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण वाढू लागला आहे.

जिल्ह्यातील भुसावळ, धरणगाव, जळगाव, एरंडोल, भडगाव, अमळनेर येथील स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तींपैकी 30 व्यक्तींचे तपासणी अहवाल आज सायंकाळी प्राप्त झाले असून, त्यापैकी 17 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 13 व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये भुसावळ शहरातील 5, अमळनेर येथील 2, जळगाव येथील 3, तर भुसावळ तालुक्यातील तळवेल, एरंडोल व भडगाव येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.

सद्यस्थितीत जळगाव, भुसावळ आणि अमळनेर येथील रुग्णसंख्या शतकपार गेली आहे. त्याचप्रमाणे भडगाव शहर आणि तालुका मिळून कोरोनाबाधित रुग्णसंख्या ही अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे. अमळनेर शहरात गेल्या काही दिवसांपासून पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचे प्रमाण थांबले होते. मात्र, आज पुन्हा 2 रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details