महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सरसंघचालकांनी मांडलेला विचार सकारात्मक, ज्येष्ठ स्वयंसेवक दीपक घाणेकर यांचे मत - Women Participation in rss Deepak Ghanekar

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात पुरुषांप्रमाणे महिलांचाही बरोबरीने समावेश असला पाहिजे, असा विचार यापूर्वी गोळवलकर गुरुजींनी मांडला होता. राष्ट्रसेविका समितीच्या माध्यमातून तो अंमलात देखील आणला गेला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात महिलांचा सहभाग असला तर, राष्ट्रकार्याचा त्यांना प्रत्यक्ष अनुभव घेता येईल. त्यामुळे, सरसंघचालकांनी मांडलेला विचार सकारात्मक म्हणता येईल, असे घाणेकर म्हणाले.

Senior volunteer Deepak Ghanekar view
सरसंघचालकांनी मांडलेला विचार सकारात्मक

By

Published : Oct 12, 2021, 8:24 PM IST

जळगाव -राष्ट्रीय स्वयंसेवक संघात पुरुषांप्रमाणे महिलांचाही बरोबरीने समावेश असला पाहिजे, असा विचार यापूर्वी गोळवलकर गुरुजींनी मांडला होता. राष्ट्रसेविका समितीच्या माध्यमातून तो अंमलात देखील आणला गेला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात महिलांचा सहभाग असला तर, राष्ट्रकार्याचा त्यांना प्रत्यक्ष अनुभव घेता येईल. त्यामुळे, सरसंघचालकांनी मांडलेला विचार सकारात्मक म्हणता येईल, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जळगावातील ज्येष्ठ स्वयंसेवक दीपक गजानन घाणेकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना मांडले.

माहिती देताना ज्येष्ठ स्वयंसेवक दीपक घाणेकर

हेही वाचा -विशेष : सणासुदीच्या काळात सोने-चांदीत घसरण; 'एवढे' कमी होऊ शकतात दर...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी उत्तराखंडातील हलद्वानी येथे झालेल्या एका कार्यक्रमात, राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कमीत कमी 50 टक्के महिलांना सहभागी करावे लागेल, असे मत व्यक्त केले होते. सरसंघचालकांच्या या मतासंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना काय वाटते? हे जाणून घेण्याचा 'ईटीव्ही भारत' ने प्रयत्न केला. त्यावेळी दीपक घाणेकर बोलत होते.

जळगावातील ज्येष्ठ स्वयंसेवक आहेत घाणेकर

दीपक गजानन घाणेकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जळगावातील ज्येष्ठ स्वयंसेवक आहेत. त्यांचे वडील गजानन त्र्यंबक घाणेकर हे देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. वडील राष्ट्रीय स्वयंसेवक संघात समर्पित भावनेने काम करत होते. त्यामुळे, संघाच्या विचारांचा मोठा प्रभाव दीपक घाणेकर यांच्यावर बालपणापासूनच होता. त्यामुळे, बालपणापासूनच त्यांची नाळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडली गेली होती. आज वयाच्या सत्तरीतही ते संघाच्या विचारांशी बांधील आहेत.

काय म्हणालेत घाणेकर?

सरसंघचालकांच्या वक्तव्यासंदर्भात मत मांडताना दीपक घाणेकर पुढे म्हणाले की, सरसंघचालक भागवत यांनी मांडलेले मत हे निश्चितच राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून बघायला हवे. ज्या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. तेव्हा राष्ट्रकार्यात महिलांचाही सहभाग असला पाहिजे, या उद्देशाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यप्रणालीशी सुसंगत काम करणारी, परंतु खास महिलांसाठीचे व्यासपीठ म्हणून राष्ट्रसेविका समितीची स्थापना करण्यात आली. त्याच्या शिल्पकार मावशीबाई केळकर होत्या. आज राष्ट्रसेविका समिती ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धर्तीवरच राष्ट्रहिताचे काम करत आहे. राष्ट्रसेविका समिती अस्तित्वात असल्याने महिला राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रत्यक्षपणे सहभागी असल्याचे दिसत नाही. मात्र, राष्ट्रसेविका समितीचा भाग असलेल्या महिला या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाप्रमाणेच विधायक कार्य करत आहेत, हे नाकारता येणार नाही, असेही घाणेकर यांनी सांगितले.

महिलांचा सहभाग नसला तरी हातभार असतोच

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आजही आपले कार्य करण्यासाठी फिरत असतात. या निमित्ताने ते वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या स्वयंसेवकांच्या घरीही जात असतात. अशा प्रचारकांच्या सेवेची संघ परिवारात परंपरा चालत आलेली आहे. यात संघ परिवारातील महिलांचा वाटा विसरता येणार नाही. त्यामुळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यात महिलांचा प्रत्यक्ष सहभाग नसला तरी हातभार मात्र असतोच, असेही दीपक घाणेकर म्हणाले.

सरसंघचालकांच्या विचारांचे सकारात्मक परिणाम बघायला मिळतील

सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडलेला विचार हा गोळवलकर गुरुजी यांच्या विचारांवर आधारित आहे. त्याचे सकारात्मक परिणाम निश्चितच राष्ट्रकार्याच्या दृष्टिकोनातून बघायला मिळतील, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा -जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत 'बंद'चा परिणाम नाही; भाजीपाला खरेदी-विक्रीसाठी गर्दी

ABOUT THE AUTHOR

...view details