जळगाव -मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथे काकाच्या लग्नाला आलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. मुलीचे हातपाय बांधून आणि तोंडाला रुमाल बांधून अत्याचार करण्यात आला. या प्रकरणातील आरोपीला जळगावातून ताब्यात घेण्यात आले.
हेही वाचा -रात्रीच्या संचारबंदीला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; पहिल्या दिवशी रस्त्यांवर शुकशुकाट
मध्यप्रदेशातील नेपानगर येथील मुलगी ही भावाच्या लग्नानिमित्त कुटुंबासह उचंदा या गावी आली होती. ती आई-वडिलांसोबत तीन दिवसांपासून मुक्कामी होती. याच लग्नासाठी चेतन सुतार (वय २०) हा देखील आपल्या आईसोबत आलेला होता. चेतन मुलीवर लक्ष ठेऊन होता. दरम्यान, मुलगी घराजवळील गिरणीत राहिलेली तिची चप्पल घेण्यासाठी गेली होती. मुलगी एकटी असल्याचा फायदा घेत चेतनने गिरणीचा दरवाजा बंद केला व तिचे हातपाय बांधून तिच्यावर अत्याचार केला.