जळगाव - तालुक्यातील शिरसोली येथील एका 16 वर्षीय मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, मानसिक स्वास्थ दिनाच्या दिवशी अल्पवयीन मुलाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
धक्कादायक : मानसिक स्वास्थदिनीच जळगावात अल्पवयीन मुलाची आत्महत्या! - Minor boy commits suicide
शिरसोली येथील एका 16 वर्षीय मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
विपीन रामकृष्ण मोरे (भिल्ल) असे आत्महत्या करणाऱ्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. शनिवारी सकाळपासून विपीन हा घरीच होता. त्याचे आई-वडील शेतात कामाला गेले होते. त्याचा मोठा भाऊ देखील कामाच्या निमित्ताने घराबाहेर होता. घरात एकटा असताना त्याने घराच्या छताला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार शेजारच्या लोकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी विपीनच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी घराकडे धाव घेतली. घरातील मृतदेह पाहताच विपीनच्या कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला.
याप्रकरणी शिरसोलीचे पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी दिलेल्या खबरीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, विपीनने आत्महत्या का केली? याचे कारण स्पष्ट झालेले नाही. या घटनेचा पोलीस पुढील तपास करत आहेत.