महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'आमच्यावर टीका केल्याशिवाय 'ते' महाराष्ट्रात मोठे होऊ शकत नाही' - महाविकास आघाडी मंत्रिमंडळ बैठक

आमच्यावर टीका केल्याशिवाय ते महाराष्ट्रात मोठे होऊ शकत नाही; आणि जे आमच्यामुळे मोठे झाले त्यांनी आमच्यावर टीका करू नये तर मग कोणावर टीका करावी', अशा शब्दांत गुलाबराव पाटलांनी भाजपवर टीकेचे बाण सोडले आहेत.

'ते' महाराष्ट्रात मोठे होऊ शकत नाही'
'ते' महाराष्ट्रात मोठे होऊ शकत नाही'

By

Published : Jan 7, 2021, 7:26 AM IST

Updated : Jan 7, 2021, 9:54 AM IST

जळगाव- भाजप नेत्यांकडून शिवसेनेवर सातत्याने टीकाटिप्पणी केली जात आहे. शिवसेनेचे उपनेते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावात आपल्या खास शैलीत भाजप नेत्यांच्या वक्तव्यांचा समाचार घेतला आहे. 'आमच्यावर टीका केल्याशिवाय ते महाराष्ट्रात मोठे होऊ शकत नाही; आणि जे आमच्यामुळे मोठे झाले त्यांनी आमच्यावर टीका करू नये तर मग कोणावर टीका करावी', अशा शब्दांत गुलाबराव पाटलांनी भाजपवर टीकेचे बाण सोडले आहेत.

राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी पार पडली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मंत्री गुलाबराव पाटील हे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातून या बैठकीला उपस्थित राहिले. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप नेत्यांच्या भूमिकेला प्रत्युत्तर दिले. या सोबतच कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे पणन महासंघाने थकवलेले पेमेंट, 8 जानेवारीला जिल्ह्यात होणारी कोरोना लसीची ड्रायरन याबाबत माहिती दिली.

'आमच्यावर टीका केल्याशिवाय 'ते' महाराष्ट्रात मोठे होऊ शकत नाही'
शासनाने थकहमी घेतल्याने शेतकऱ्यांना मिळतील कापसाचे पैसे-राज्यात अनेक ठिकाणी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापूस दिल्यानंतर पणन महासंघाकडून पैसे मिळालेले नाहीत. यावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, हा थकहमीचा विषय आहे. आता राज्य शासनाने ही थकहमी घेतल्याने शेतकऱ्यांना लवकरच त्यांच्या खात्यावर पैसे देण्याचा निर्णय झाला आहे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 8 जानेवारीला कोरोना लसीची ड्रायरन होणार आहे. त्यासाठी त्या त्या जिल्ह्यातील पालकमंत्र्यांना उपस्थिती राहण्याचे निर्देश आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आले, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
Last Updated : Jan 7, 2021, 9:54 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details