महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चांद्यापासून ते बांद्यापर्यंत प्रत्येक मराठी माणसाचे हित साधणारा अर्थसंकल्प - मंत्री गुलाबराव पाटील

चांद्यापासून ते बांद्यापर्यंत प्रत्येक मराठी माणसाचे हित साधणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

minister gulabrao patil reaction on Maharashtra budget 2021
चांद्यापासून ते बांद्यापर्यंत प्रत्येक मराठी माणसाचे हित साधणारा अर्थसंकल्प- मंत्री गुलाबराव पाटील

By

Published : Mar 8, 2021, 7:36 PM IST

जळगाव -राज्यातील महाविकास आघाडी सरकारने आज विधीमंडळात मांडलेला अर्थसंकल्प हा समाजाच्या सर्व स्तरांमधील जनतेच्या हिताचा आहे. एकप्रकारे सर्वसमावेश प्रगतीचा संकल्प सरकारने मांडला आहे. चांद्यापासून ते बांद्यापर्यंत प्रत्येक मराठी माणसाचे हित साधणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आज विधीमंडळात राज्याचा यंदाचा अर्थसंकल्प जाहीर केला. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना गुलाबराव पाटील म्हणाले की, आजच्या अर्थसंकल्पातील सर्व तरतुदींचा केंद्रबिंदू हा सर्वसामान्य माणूस आहे. जगाचा पोशिंदा असणार्‍या बळीराजाला तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्जाची योजना ही शेतकर्‍यांच्या उत्थानासाठी खूप महत्वाची ठरणार आहे. कृषी व कृषीवर आधारित योजनांसाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या असून, याच्या जोडीला समाजाच्या विविध स्तरांमधील नागरिकांना विकासाची फळे मिळावीत म्हणून तरतुदी केल्या आहेत. यात महिलांसाठी अतिशय क्रांतीकारी असे निर्णय देखील घेण्यात आलेले आहेत, असे त्यांनी सांगितले.

राज्यात कुणीही तहानलेला राहणार नाही -
गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, सरकारने कोरोनाग्रस्तांसाठी जिल्हा पातळीवर रुग्णालय आणि पोस्ट-कोविड रुग्णांना समुपदेशनाची उपलब्ध केलेली सुविधा देखील महत्वाची आहे. तर माझ्या खात्याशी संबंधित असणार्‍या जलजीवन मिशनच्या अंतर्गत राज्यातील घरांना नळ जोडणीचे उद्दीष्टदेखील ठेवण्यात आलेले आहे. गतवर्षी कोविडमुळे निधीत अडचणी आल्या असल्या तरी यंदा पाणीपुरवठा व स्वच्छता खात्यालाही 2 हजार 533 कोटी रुपयांचा निधी मिळाला असून, यातून राज्यातील कुणीही तहानलेला राहणार नाही हा विश्‍वास आहे, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा -जळगाव; गिरणा धरणातील पाणीसाठा ५० टक्क्यांनी घटला; उन्हाळ्यात प्रशासनाची कसाेटी

हेही वाचा -विद्यार्थिनींना मोफत बस प्रवास; राज्य सरकारच्या निर्णयाचे पालकवर्गाकडून स्वागत

ABOUT THE AUTHOR

...view details