जळगाव -राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतेएकनाथ खडसे ( Ncp Leader Eknath Khadse ) आणि भाजप आमदार गिरीश महाजन ( Bjp Mla Girish Mahajan ) यांनी आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र आले पाहिजे, असे मत पाणीपुरवठा स्वच्छतामंत्री आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील ( Jalgaon Guardian Minister Gulabrao Patil ) यांनी व्यक्त केले आहे.
राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे व भाजप नेते गिरीश महाजन यांच्यामध्ये सध्या जोरदार आरोप-प्रत्यारोपाच्या सामना सुरू आहे. यावर आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाष्य केले आहे. गिरीश महाजन व एकनाथराव खडसे यांनी आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र आले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.