जळगाव -शिवसेना नेते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. "राणेंनी बांद्रा येथे घर बांधले तेव्हा रेती मीच पाठवली होती. आणि मी सुपारीचोर आहे तर त्यांच्या वडिलांची हाऱ्या-नाऱ्याची गॅंग होती, हे त्यांनी आठवावे." अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी निलेश राणेंना टोला लगावला.
प्रतिक्रिया देताना मंत्री गुलाबराव पाटील हेही वाचा -VIDEO : कैऱ्या तोडल्याने अल्पवयीन मुलाला झाडाला बांधले
मंत्री गुलाबराव पाटील हे आज पीक विमा योजनेच्या विषयासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीच्या निमित्ताने आलेले होते. ही बैठक आटोपल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
राणेंनी काय टीका केली होती?
भाजपचे युवा नेते निलेश राणे हे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभर दौरा करत आहेत. सोमवारी ते जळगावात आलेले होते. जळगाव जिल्ह्यातील वाळू चोरीच्या मुद्द्यावरून त्यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर विखारी टीका केली होती. 'जिल्ह्यात जी वाळू चोरी सुरू आहे, ते कलेक्शन गुलाबराव पाटील यांच्यासाठीच सुरू असेल. वाळू चोरीचे हफ्ते स्थानिक आमदार आणि मंत्र्यांकडे पुरवले जातात. गुलाबराव हे आधी पानटपरी चालवायचे. तेच ना गुलाबराव. इथे पालकमंत्री आहेत सुपारीचोर. ती व्यक्ती सामाजिक किंवा विधायक काम करू शकत नाही. आता गुलाबराव काय युनिव्हर्सिटी आणणार? ते वाळूच चोरणार. यातले सगळे कलेक्शन त्यांच्याकडे जात असणार', अशी टीका राणे यांनी केली होती.
वाळू चोरांशी संबंध सिद्ध करून दाखवावा
निलेश राणे यांच्या टीकेला गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. माझा वाळू चोरांशी संबंध असेल तर तो निलेश राणे यांनी सिद्ध करून दाखवावा. त्यांच्या वडिलांची हाऱ्या-नाऱ्याची गँग होती, हे मला माहिती आहे, असे ते म्हणाले.
हेही वाचा -Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण देणे ठाकरे सरकारच्या मनात कधीच नव्हते - निलेश राणे