महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विरोधक वैफल्यग्रस्त अन् निराश; वशीकरणाच्या टीकेवर गिरीश महाजनांचा शेरोशायरीतून चिमटा - jalgaon news

शहरातील अजिंठा शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पत्रकारांनी आमदार डॉ. सतीश पाटील यांनी गिरीश महाजन यांच्यावर केलेल्या टीकेबाबत विचारणा केल्यावर महाजन यांनी प्रत्युत्तर खास शैलीत दिले.

गिरीश महाजन

By

Published : Sep 11, 2019, 10:25 PM IST

जळगाव- सध्या आमचे विरोधक वैफल्यग्रस्त आणि निराशेत आहेत. त्यामुळे ते काहीही टीका करत आहेत, अशा शब्दात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात विरोधकांना चिमटा काढला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. सतीश पाटील यांनी केलेल्या वशीकरणाच्या टिकेचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. तंत्र-मंत्राने काहीही होत नसते. माझा त्यावर विश्वास देखील नाही, असे सांगत महाजन यांनी शेरोशायरी करत विरोधकांची चांगलीच खिल्ली उडवली.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

हेही वाचा - राज ठाकरे 'ईडी'च्या चौकशीनंतर गप्प झालेत - अजित पवार

शहरातील अजिंठा शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पत्रकारांनी आमदार डॉ. सतीश पाटील यांनी गिरीश महाजन यांच्यावर केलेल्या टीकेबाबत विचारणा केल्यावर महाजन यांनी प्रत्युत्तर खास शैलीत दिले. महाजन पुढे म्हणाले, विरोधी पक्ष इतके वैफल्यग्रस्त आणि निराशेत आहेत की ते काहीही टीका करत आहेत. डॉ. सतीश पाटील यांना तर सोडा पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील निराश आहेत. पत्रकारांनी तुमचे नातेवाईक तुम्हाला सोडून जात आहेत, असे म्हटल्यावर ते चिडले. या प्रश्नावर ते काहीही बोलून टाळू शकले असते. मात्र, यावरून पत्रकार परिषद सोडून जाणे योग्य नव्हते. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय चालले आहे? हे आपल्या लक्षात येते, असे महाजन म्हणाले.

हेही वाचा - राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार : गणेश नाईकांचा 48 नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश

गिरीश महाजनांची शेरोशायरी-

माझा तंत्र-मंत्रावर विश्वास नाही. मी कधीही ज्योतिषाला हात दाखवलेला नाही. माझा माझ्या कर्मावर पूर्ण विश्वास आहे, असे सांगत महाजन यांनी ''न रहा चांद सितारोका मैं मोहताज कभी, अपने मेहनत के मैने सदा उजाले देखे हैं, और तजकेरा लकीरोका उसने वही छोड दिया; जब नुजुरबाने मेरे हातो मे छाले देखे'' हा शेर म्हटला.

ABOUT THE AUTHOR

...view details