महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगाव : मनपातील विविध समित्या गठीत करण्यासाठी गटनेत्यांची बैठक - जळगाव महानगरपालिका बातमी

महानगरपालिकेतील बांधकाम समिती, अतिक्रमण समिती यासह विविध 11 समित्यांच्या सदस्य संख्या निश्चीत करण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती.

meeting-of-leaders-to-form-a-various-committees-in-jalgaon-munciple-corporation
जळगाव : मनपातील विविध समित्या गठीत करण्यासाठी गटनेत्यांची बैठक

By

Published : Feb 12, 2021, 7:30 PM IST

जळगाव -महानगरपालिकेतील बांधकाम समिती, अतिक्रमण समिती, स्वच्छता समिती, पाणी पुरवठा समिती यासह विविध 11 समित्यांच्या सदस्य संख्या निश्चीत करण्यासंदर्भात शुक्रवारी महापौर भारती सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी विविध या समित्यांच्या सदस्यांची संख्या निश्चीत करण्यात आली.

भाजपच्या 5 तर, सेनेच्या 2 सदस्यांचा समावेश-

प्रत्येक समितीमध्ये 7 सदस्य असून त्यात पक्षीय संख्याबळानुसार भाजपच्या 5 तर, सेनेच्या 2 सदस्यांचा समावेश करता येणार आहे. सदस्य संख्येनुसार एमआयएमचे सदस्य कमी असल्याने त्यांच्या सदस्यांचा समितीमध्ये समावेश करता येऊ शकणार नाही.

महासभेत समित्यांना मिळणार मान्यता -

मनपात असलेल्या बांधकाम समिती, अतिक्रमण समिती, स्वच्छता समिती, पाणी पुरवठा समिती, दवाखाना समिती, नियोजन समिती, आस्थापना समिती, विधी समिती, वाहन व्यवस्था समिती, शिक्षण समिती, विद्युत समितीमध्ये सदस्य निवडीसाठी गटनेत्यांनी आपापल्या पक्षाच्या सदस्यांची नावे बंद पाकीटात महासभेत महापौरांकडे द्यायची असून त्यानंतर महासभेत समित्यांना मान्यता दिली जाणार आहे.

हेही वाचा - नागपुरात पुन्हा होऊ शकतो कोरोनाचा उद्रेक, एकाच दिवसात ५०० रुग्ण आढळल्याने चिंता

ABOUT THE AUTHOR

...view details